ढोलबारे परिसरात बिबट्याने केले घोड्याला ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

सटाणा : ढोलबारे (ता.बागलाण) येथील मोठाभाऊ दोधा सूळ यांच्या ढोलबारे - पारनेर रस्त्यावरील पांडे फार्मजवळील शेतात काल मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने सूळ यांच्या मालकीच्या घोड्याला ठार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे ढोलबारे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. 

सूळ हे रात्री कांद्याला पाणी भरत असताना परिसरातील कुत्री जोरजोरात भुंकत होती. कुत्र्यांचे भुंकणे बंद होत नसल्याने सूळ यांनी परिसरात आपल्या बॅटरीने प्रकाश टाकला असता त्यांना बिबट्या घोड्याला फस्त करत असताना आढळून आला. त्यांनी आरडाओरडा केला असता बिबट्याने जवळच असलेल्या कुंभाऱ्या डोंगराकडे पळ काढला. 

बिबट्याने सूळ यांच्या मालकीचा घोडा ठार केल्याने त्यांचे २० ते २५ हजारांचे नुकसान झाले आहे. वनरक्षकांनी आज सकाळी घटनेचा पंचनामा केला. गेल्या महिन्यात देखील बिबट्याने परिसरातील वासरू, बकऱ्यांवर हल्ला केल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. पंचनाम्यावेळी वनरक्षक ठाकरे, दहितकर, वन्यप्रेमी स्वप्निल पांडे, वसंत सूळ आदी उपस्थित होते.

Web Title: Marathi News Nashik News Leopard attacked on Horse