एसटी चालक धर्मा पवार जपताहेत मुखवटे बनवण्याची कला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

खामखेडा (नाशिक) : बोहाडा या उत्सवासाठी लागणाऱ्या देवदेवतांचे मुखवटे बनविण्यासाठी उत्तर महाराष्ट्रात खामखेडा गावाची ओळख आहे. आजही खानदेशात बोहाडा उत्सव साजरा होत असतो. या उत्सवासाठी लागणारे मुखवटे सोंग तयार करण्यासाठी खामखेडा येथील ठाकूर घराण्याची विशेष ओळख होती. या घराण्यातील चौथ्या पिढीतील सद्ष्य एसटी चालक धर्मा पवार (ठाकूर) व सुभाष पवार (ठाकूर) यांनी आजही ही ओळख टिकवून ठेवली असून त्यांच्या मुखवट्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

खामखेडा (नाशिक) : बोहाडा या उत्सवासाठी लागणाऱ्या देवदेवतांचे मुखवटे बनविण्यासाठी उत्तर महाराष्ट्रात खामखेडा गावाची ओळख आहे. आजही खानदेशात बोहाडा उत्सव साजरा होत असतो. या उत्सवासाठी लागणारे मुखवटे सोंग तयार करण्यासाठी खामखेडा येथील ठाकूर घराण्याची विशेष ओळख होती. या घराण्यातील चौथ्या पिढीतील सद्ष्य एसटी चालक धर्मा पवार (ठाकूर) व सुभाष पवार (ठाकूर) यांनी आजही ही ओळख टिकवून ठेवली असून त्यांच्या मुखवट्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

मनोरंजनाची साधने हातावर थिरकू लागल्याने पूर्वीच्या पारंपारिक मनोरंजनाच्या साधनांना व कला प्रकारांना सध्या वाईट दिवस आहेत. पूर्वी गावांमध्ये करमणुकीची साधने नव्हती. त्यामुळे बोहाडा, भजन, कीर्तन, गोंधळ, जागरण असे लोकोत्सव मोठ्या उत्सहात साजरे केले जात. त्यात बोहाडा उत्सवाला फार महत्व होते. मात्र कसमादे,खानदेशासह उत्तर महाराष्ट्रात मात्र बोहाडा हा कला प्रकार आजही अनेक गावांमध्ये ठीकून असून ही परंपरा ठिकवून ठेवण्यासाठी तरुण पिढी प्रयत्न करत आहे.

बोहाडा उत्सव खानदेशात तीन किंवा सात दिवस चालतो. गावातील लोक एकत्र जमून या उत्सवाचे आयोजन करतात. या उत्सवामध्ये देवदेवतांचे मुखवटे धारण करून सांबळ वाद्याच्या ठेक्यावर नाचत गणपती, सारजा एकादशी, द्वादशी, महादेव, मारुती, गरुड, चंद्र, सूर्य,गजासुर, बकासुर, राम, लक्ष्मण, देवी असे अनेक देवतांचे मुखवटे नाचवत असतात.

उत्सवासाठी लागणारे मुखवटे बनविण्याची कला खामखेडा गावातील ठाकूर समाजातील कै. रायसिंग ठाकूर यांच्या घराण्यात होती. त्यानंतर वडिलोपार्जित  परंपरा टिकून राहवी म्हणून या चौथ्या पिढीतील धर्मा पवार (ठाकुर) व पुतण्या सुभाष ठाकुर मुखवटे बनवितात.

धर्मा पवार  हे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात कळवण आगारात चालक या पदावर कार्यरत आहेत. वडिलोपार्जित असलेली मुखवटे बनविण्याची परंपरेने थोडासा का होईना आर्थिक हातभार लागेल म्हणून धर्मा पवार हे फावल्या वेळेत  मुखवटे बनविण्याचे काम करीत असतात. त्यांच्या या मुखवट्यांना कसमादे भागासह, येवला, नांदगाव, दिंडोरी, सुरगाणा, चाळीसगाव, धुळे, जळगाव, पाचोरा, अमळनेरसह खान्देशातील बोहाडा होणाऱ्या गावांमधून मागणी आहे.

मुखवटा कसा होतो तयार?

मुखवट्याच्या आकाराचा साचा तयार करत त्यावर मेथीच्या पीठातील कागदाचा लगदा लावतात. या लगद्यावर देवतांचे मुखवटे बनवायचे आहेत त्या आकारानुसार आकर्षक रित्या लगदा लावत त्यात नाक डोळे, कपाळ यांचा आकार दिला जातो. मुखवटा परिपूर्ण झाल्यावर साजेसा रंग दिला जातो. आपल्या पूर्वजांनी नावारूपास आणलेल्या कला पुनर्जीवित केल्याने आम्हाला आंनद असल्याचे  व शासनाने कलाकारांना मानधन सुरु करावे, असे मत मुखवटे मूर्तिकार  धर्मा पवार (ठाकुर) यांनी व्यक्त केले. 

 

       
 

Web Title: Marathi news nashik news mask of lord festival art st driver