वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी

दिगंबर पाटोळे
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

वणी (नाशिक) : येथील ग्रामिण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभार व रुग्णालयातील असुविधांबाबत वणी ग्रामस्थांच्या तक्रारींची जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी दखल घेत दोषी वैद्यकिय अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करीत वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहाण्याचा आदेश बजावण्यात आला आहे.

वणी (नाशिक) : येथील ग्रामिण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभार व रुग्णालयातील असुविधांबाबत वणी ग्रामस्थांच्या तक्रारींची जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी दखल घेत दोषी वैद्यकिय अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करीत वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहाण्याचा आदेश बजावण्यात आला आहे.

येथील ग्रामिण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी व काही आरोग्य कर्मचाऱ्यांविषयी वाढत्या तक्रारी व रुग्णालयातील असुविधांबाबत 1 फेब्रुवारी रोजी संतप्त ग्रामस्थांनी रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. अरुण पवार यांना घेराव घालीत प्रश्नांचा भडीमार केला होता. याबाबत जिल्हा परीषद सदस्या छायाताई गोतरणे, वणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी ग्रामिण रुग्णालयातील समस्यांबाबत जिल्हा शल्यचिकीत्सकांची बैठक बोलविण्याची मागणी लेखी पत्रान्वये केली होती. 

त्यानुसार आज (ता. 7) बुधवारी येथील ग्रामिण रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. अनंत पवार, तालुका वैद्यकिय अधिक्षक डॉ.. राजेश कोशीरे, जिल्हा परीषद सदस्या छाया गोतरणे, उपसरपंच विलास कड, माजी जिप सदस्य बाळासाहेब गांगुर्डे, माजी पंचायत समिती सदस्य अॅड. विलास निरगुडे, माजी सरपंच मधुकर भरसट, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष किरण गांगुर्डे, रविकुमार सोनवणे, संजय उंबरे, राजेंद्र गोतरणे, सतिश जाधव आदींच्या प्रमुख उपस्थित बैठक पार पडली. यावेळी रूग्णालायातील मनमानी व ढिसाळ कारभाराच्या तक्रारींचा पाढा ग्रामस्थांनी वाचला. रुग्णांवर वेळीच उपचार केले जात नाही, गरज नसताना रुग्णांना जिल्हारुग्णालयात रेफर केले जाते. तीन वैद्यकिय अधिकारी रुग्णालयात नेमणूक असताना एकही अधिकारी वेळेवर हजर न राहणे आदी कारणांमुळे वणी ग्रामीण रूग्णालयातील रूग्णसेवा पूर्ण कोलमडल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. 

सर्व तक्रारी डॉ. जगदाळे यांनी ऐकून घेत रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. अरुण पवार यांच्यावर संपूर्ण रुग्णालयाची जबाबदारी असून कामचुकार करणारे व बेजाबदारपणे रुग्ण हाताळणाऱ्या वैद्यकिय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत 

अहवाल तयार करणे, पगार राखने, औषधे खरेदी करणे, वैद्यकिय अधिकारी उपस्थित नसेल तर खाजगी डॉक्टरांची बोलावून रु्ग्णावर उपचार करणे, यासाठी रुग्णांकडून पैसे न घेणे आदी बाबतच्या सूचना केल्या. तसेच सर्व कर्मचाऱ्यांची बैठकीच्या दालनात हजेरी घेऊन सर्वांना मुख्यालयी राहाण्याचा आदेश दिला. अन्यथा अशा कर्मचाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याबाबतची कार्यवाही केली जाईल अशी तंबीही जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. जगदाळे यांनी दिली. 

यावेळी ग्रामस्थ व पत्रकारांनी ट्रामा केअरची इमारत चार वर्षांपासून धुळखात पडत असून ट्रामा केअर सुरु करण्याबाबतची मागणी केली. यावेळी प्रशासकीय पातळीवरील आवश्यक पाठपुरावा केलेला असून मंत्रालयीन स्तरावर लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे डॉ. जगदाळे यांनी सांगितले. दरम्यान वणी ग्रामिण रुग्णालयात वादग्रस्त व वैद्यकिय रजेवर असलेल्या तीघाही वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याची माहीतीही डॉ. जगदाळे यांनी दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष गवळी, इंदा गांगुर्डे, नाना जाधव, गणेश खरे, जगण सताळे, राजु परदेशी, राहुल गांगुर्डे, प्रकाश देशमुख आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title: Marathi news nashik news medical officers complaints