'मोरया कॉन्स्ट्रुवेल'च्या चौथ्या संशयिताला अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

नाशिक - शिर्डीच्या काकडी विमानतळालगत बिगरशेती भूखंड स्वस्तात विक्रीचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी मोरया कॉन्स्ट्रुवेलच्या चौथा संशयित जितेंद्र जगतापला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, संशयितांच्या साथीदारांकडून गुंतवणूकदारांना तक्रारी न देण्यासाठी धमकावले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत.

आत्तापर्यंत 12 गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रारी दिल्या असून, तिघांना यापूर्वीच अटक झाली आहे. नाशिकसह जळगाव, धुळे आणि नगर परिसरातील अनेकांची फसवणूक झाल्याने तेथील गुंतवणूकदार सरकारवाडा पोलिसात तक्रारीसाठी येत आहेत; मात्र भीतीपोटी काही गुंतवणूकदार तक्रारीसाठी पुढे येत नसल्याचे काही जणांनी सांगितले.
सुरेश पाटील (रा. जळगाव) यांच्यासह सात जणांनी "मोरया कॉन्स्ट्रुवेल'मध्ये पैसे गुंतविले; परंतु यात फसवणूक झाल्यानंतर या प्रकरणी गेल्या बुधवारी (ता. 31) मोरया कॉन्स्ट्रुवेलच्या पाचही संशयितांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एक जण अद्याप फरारी आहे.

Web Title: marathi news nashik news moraya constrvel crime