मुकणे थेट जलवाहिनीला सहा महिन्यांची मुदतवाढ?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

नाशिक - गेल्या वर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे पाण्याची मागणी कमी झाल्याने तुडुंब भरलेल्या मुकणे धरणातून सद्यःस्थितीत पाण्याचे आवर्तन सोडले जाणार नाही. त्यामुळे थेट जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंपनीला सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे काम लांबणीवर पडून मुकणे धरणाच्या पाण्यासाठी नाशिककरांना डिसेंबरअखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन गंगापूर धरणातील पाणीसाठा नागरिकांना पुरणार नसल्याने इगतपुरी तालुक्‍यातील मुकणे धरणाचे पाणी शहरासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार मुकणे धरणातून अठरा किलोमीटरची थेट जलवाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत जलवाहिनीचे काम सुरू असून, एल ॲन्ड टी कंपनीला २६५ कोटींचे काम दिले आहे. योजना राबविताना मुकणे धरणात पंपिंग स्टेशन उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. विल्होळी येथील जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचे काम पूर्णत्वास आले असून, येथील पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या सिडको, पाथर्डी, इंदिरानगर, राजीवनगर तसेच थेट गांधीनगरपर्यंत पुरविण्याचे नियोजन आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने धरण तुडुंब भरल्याने पंपिंग स्टेशनच्या हेडवर्क्‍स उभारण्याच्या कामात अडचणी निर्माण होत आहेत. जोपर्यंत धरणाच्या पाण्याची पातळी खोलवर जात नाही, तोपर्यंत कामे करता येत नसल्याची बाब जानेवारीत तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जलसंपदा विभागाकडे आवर्तन सोडण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु पाण्याची मागणी नोंदविली जात नाही, तसेच खालच्या धरणांमध्ये पुरेसे पाणी असल्याने आवर्तन सोडण्यास जलसंपदा विभागाने नकार दिला होता. २८ फेब्रुवारीला एक आवर्तन सोडल्याने धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. हेडवर्कच्या कामाचा मार्ग मोकळा झाला असला तरी हेडवर्क्‍सचे काम फक्त ५८ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत काम पूर्ण होण्याची शक्‍यता नाही.

Web Title: marathi news nashik news mukane water line