सहावीत शिकणाऱ्या सार्थकला बालवैज्ञानिक स्पर्धेत कांस्य

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित व्ही.जे. हायस्कूलमध्ये सहावीत शिकणाऱ्या सार्थक गायकवाड याने मुंबई विज्ञान अध्यापक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावले.

नांदगाव : बृहन्मुंबई येथील विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणिवा व ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित व्ही.जे. हायस्कूलमध्ये सहावीत शिकणाऱ्या सार्थक गायकवाड याने मुंबई विज्ञान अध्यापक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावले.

या स्पर्धेत यशस्वी झालेला संस्थेचा व जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी असून, त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. या परीक्षेचे चार टप्पे असून, अतिशय खडतर होती. त्याने या परीक्षेत उत्तम यश मिळवत प्राविण्य मिळवले. पहिल्या टप्प्यात जिल्हा स्तरावर लेखी परीक्षा झाली. दुसऱ्या टप्प्यात पुणे येथे प्रत्यक्षिक परीक्षा घेतली गेली. तिसऱ्या टप्प्यात त्याने शाळेतील एक समस्या निवडून त्यावर संशोधन केले गेले. त्यात सार्थकने संशोधनासाठी 'शाळेचा कचरा करू साफ,हाच आम्हा विद्यार्थ्यांचा ध्यास' ही समस्या निवडली होती.

या संशोधनांतर्गत शाळेमध्ये ‘टाकाऊपासून टिकावू कार्यशाळा’ , ‘कंपोस्टखत निर्मिती’ हे उपक्रम व ‘वर्ग सुशोभिकरण स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या संपूर्ण समस्येवर त्याने प्रबंध चौथ्या टप्प्यात मुलाखतीदरम्यान मुंबई येथे सादर केला. या मुलाखतीचा टप्पादेखील त्याने यशस्वीपणे पार केला. नांदगावसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अतिशय आत्मविश्वासाने दिली.  

यशवंत नाट्यगृह मुंबई येथे शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, डॉक्टर सुलभा कुळकर्णी यांच्या विशेष उपस्थितीत झालेल्या बक्षीस वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते झाला. यामध्ये सार्थकला कांस्यपदक प्रदान करण्यात आले.

सार्थक हा नाशिक शिक्षण प्रसारक मंडळच्या व्ही.जे.हायस्कूलच्या डॉ.सी.व्ही.रमण टॅलेंट अकादमीचा विद्यार्थी असून, त्याला या बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत विद्यालयातील विज्ञान शिक्षक मुकेश ठोंबरे, निवेदिता सांगळे, गायत्री आंबेकर, त्याचे वडील विलास गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे सेक्रेटरी डी.जी. कुलकर्णी, संकुल प्रमुख शशिकांत आंबेकर, शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे, मुख्याध्यापक नरेंद्र ठाकरे, उपमुख्याध्यापक संजय पवार, टी .एम.बोर्ड अध्यक्ष भैयासाहेब चव्हाण, पर्यवेक्षक शाम सोनस, भास्कर जगताप व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

Web Title: Marathi News Nashik News Nadgaon News Sarthak gaikwad won Bronze Medal