नांदगाव बाजारपेठेत व्यापार्‍यांची 'बेमुदत बंद'ची हाक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

नांदगाव : येथील बाजार समितीच्या आवारात संचालक मंडळाने वजनकाटा सुरु करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवित खरेदीदार व्यापाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे.

शेतकरी वर्गाची गैरसोय होऊ नये या कारणास्तव पुढील निर्णय होईपावेतो आपला शेतमाल नांदगांव यार्डवर विक्रीस आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती तेज कवडे व संचालक मंडळाने केले आहे.

नांदगाव : येथील बाजार समितीच्या आवारात संचालक मंडळाने वजनकाटा सुरु करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवित खरेदीदार व्यापाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे.

शेतकरी वर्गाची गैरसोय होऊ नये या कारणास्तव पुढील निर्णय होईपावेतो आपला शेतमाल नांदगांव यार्डवर विक्रीस आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती तेज कवडे व संचालक मंडळाने केले आहे.

व्यापाऱ्यांची वजनकाट्याला विरोधाची भूमिका शेतकऱ्यांना वेठीला धरणारी असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश चव्हाण व आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष विशाल वडघुले यांनी केला आहे. येथील बाजार समितीमध्ये वजनकाटा सुरु करावा अन्यथा अधिकाऱ्यांच्या खुर्च्या पळवू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना आम आदमी पार्टीच्या वतीने काही दिवसापूर्वी देण्यात आला होता.

या इशाऱ्याची दखल घेत बाजार समिती प्रशासनाने वजन काटा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता व तशी नोटीस बाजार समिती प्रशासनाने व्यापाऱ्यांना बजाविली होती. आज खरेदीदार व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने बाजार समितीचेसभापती तेज कवडे व संचालक मंडळाला दिले. याबाबत व्यापारी व संचालक मंडळ यांच्यात बैठक होऊन वजनकाटा सुरु करण्याबाबतच्या निर्णयावर चर्चा विनिमय करण्यात आला. मात्र बाजार समितीने स्वतःचा वजनकाटा सुरु करण्याच्या निर्णयाला विरोध झाला.

त्यावर शेतकरी वर्ग आपले मर्जीनुसार बाजार समितीच्या अथवा व्यापारी वर्गाच्या वजनकाट्यावर वजन करेल अशी स्पष्ट भूमिका यावेळी बाजार समितीच्या संचालक मंडळाने घेतली. त्यालाही विरोध करीत व्यापाऱ्यांनी बाजार समितीमधील वजनकाट्यावर झालेल्या नोंदीपेक्षा प्रत्यक्ष व्यापाऱ्यांच्या खाल्यावर खरेदी झालेला मालातल्या वजनात तफावत पडण्याची साशंकता व्यक्त केली व आपला सोमवारपासून बेमुदत बंदच्या निर्णयावर ठाम राहण्याची भूमिका घेतली व्यापाऱ्यांच्या निवेदनावर  मे. भिवराज कानमाल, जय बालाजी, नूतन ट्रेडर्स, जय भवानी ट्रेडर्स, कचरदास शंकरशेट करवा, संदीप फोफालिया, आनंद ट्रेडिंग, जय बजरंग ट्रेडिंग, साई ट्रेडिंग, जय महालक्ष्मी ट्रेडिंग, सफलट्रेडिंग, केदारनाथ ट्रेडिंग, अभिजत ट्रेडिंग, श्री ट्रेडिंग, विठ्ठल ट्रेडर्स, योगेश बद्रीनारायण, हर्षल ट्रेडर्स, जय श्रीराम ट्रेडिंग, गणेश मोकळं, कैलास कवडे, नंदन ट्रेडर्स, दिलीप करवा, माँ शेरावली, राहुल ट्रेडिंग, श्री ट्रेडर्स आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

व्यापाऱ्यांच्या बेमुदत बंदच्या भूमिकेमुळे शेतकरी वर्गाची गैरसोय होवू नये म्हणून पुढील निर्णय होईपावेतो आपला शेतमाल नांदगांव यार्डवर विक्रीस आणू नये असे आवाहन सभापती तेज कवडे व संचालक मंडळाने केले आहे. दरम्यान व्यापाऱ्यांचा वजनकाट्या बाबत बेमुदत बंदचा निर्णय दुर्दैवी असून शेतकऱ्यांना वेठीला धरणारा असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

Web Title: marathi news Nashik news Nandgaon Bazar Samiti