गुलाबी थंडीत "नाशिक रन'मध्ये धावले नाशिककर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

नाशिक : नाशिक रन चॅरीटेबल ट्रस्टतर्फे आयोजित सोळाव्या "नाशिक रन'ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महात्मा नगर मैदानापासून आयोजित या उपक्रमात सहभागी होताना नाशिककरांमध्ये उत्साह जाणवत होता. नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत परदेशी अधिकाऱ्यांनीही सहभागी होत धावपटूंना प्रोत्साहित केले. ढगाळ वातावरण, गुलाबी थंडीत "नाशिक रन'मध्ये धावत नाशिककरांनी सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमातून संकलित निधीतून वर्षभर विविध सामाजिक कार्य ट्रस्टमार्फत केली जात असतात. 

औपचारीक शुभारंभाप्रसंगी नाशिकच्या महापौर रंजना भानसी, पोलिस आयुक्‍त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, ट्रस्टचे अध्यक्ष एच.एस. बॅनर्जी, उपाध्यक्ष एच. बी. थोंटेश, सचिव अनिल दैठणकर, खजिनदार राजाराम कासार, विश्वस्थ अविनाश चिंतावर, मुकुंद भट, अतुल खानापूरकर, संदीप पांडे, प्रबळ रे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावणाऱ्या धावपटूंना ट्रस्टतर्फे मदत केली जात असून, त्यासाठी निधीचा धनादेश ऑलिम्पिकपटू कविता राऊत, "साई'चे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्यासह धावपटूंच्या उपस्थितीत सुपुर्द करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांना सायकल वाटपही करण्यात आले.

महापौर रंजना भानसी यांनी हिरवा झेंडा दाखवत मॅरेथॉन गटाच्या रनची सुरवात केली. त्यानंतर टप्प्या-टप्याने सहभागींना रनसाठी सोडण्यात आले. चिमुकल्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्ये कमालीची उर्जा बघायला मिळत होती. विशेष मुलांनाही या उपक्रमात सहभागी करुन घेत विशेष गटात रन आयोजित केला होता. दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणखीच वाढविली होती. झुंबा डान्सपासून ते मायकल जॅक्‍सनचे वैशिष्ट्यपूर्ण नृत्य यावेळी सादर करण्यात आले. शेवटी लकी ड्रॉ काढत उपक्रमाचा समारोप झाला.

Web Title: Marathi news nashik news nashik run