नाशिक: अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

जयेश सूर्यवंशी
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

या अपघातामुळे जेलरोड परिसरातील अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पूर्वी त्या बद्दल वारंवार आवाज उठवूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

नाशिक : येथील जेलरोड परिसरात आज सकाळी ट्रक आणि दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

प्रवीण कुमत (वय 45) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. ट्रकने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. कुमत हे जय भवानी रोड येथील रहिवासी होते. हा अपघात इतका भयानक होता कि त्यांच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

या अपघातामुळे जेलरोड परिसरातील अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पूर्वी त्या बद्दल वारंवार आवाज उठवूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

Web Title: Marathi news Nashik news one killed in Nashik