एक रुपयाच्या नाण्याने घेतला चिमुकलीचा जीव 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

नाशिक : चांदगिरी (ता.नाशिक) येथे खेळता-खेळता एक रुपयाचे नाणे गिळल्याने 4 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली. शालिनी दत्तात्रय हांडगे (4, रा. चांदगिरी, ता. जि.नाशिक) असे चिमुकलीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदगिरी येथे राहत्या घरी रविवारी (ता. 4) दुपारी एकच्या सुमारास खेळता-खेळता शालिनी हिने तिच्याकडील एक रुपयांचे नाणे तोंडात टाकले आणि तिच्या नकळत ते गिळल्या गेले. त्यामुळे तिला त्रास होऊ लागल्याने तिचे वडील विष्णू हांडगे यांनी तिला दुपारी तीन वाजेच्या सुमारास आडगावच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान आज (ता.5) सकाळी तिचा मृत्यु झाला.

जिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन केल्यानंतर तिचा मृतदेह नातलगांच्या हवाली करण्यात आला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार गांगुर्डे हे तपास करीत आहेत.

Web Title: Marathi news nashik news one rupee coin eat by girl dies

टॅग्स