परीट समाजाला आरक्षणासाठी पाठपुरावा करू - दादा भुसे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

नाशिक - श्री संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेसाठी आयुष्य समर्पित केले. बाबांचे कार्य आदर्शवत असून, परीट समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण व इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्‍वासन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी येथे दिले.

महाराष्ट्र परीट (धोबी) समाजाचे अकरावे राज्यस्तरीय अधिवेशन आज (ता.4) नाशिक येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एकनाथ बोरसे होते. माजी केंद्रीय राज्यमंत्री शाम रजक यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्‌घाटन झाले. मध्य प्रदेशचे खासदार अमित खत्री, आमदार देवयानी फरांदे, सीमाताई हिरे आदी उपस्थित होते. देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील परीट-धोबी समाजालाही अनुसूचित जातीचे आरक्षण पूर्ववत द्यावे, असा एकमुखी ठराव या अधिवेशनात करण्यात आला. परीट धोबी सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी सटाण्याचे राजेंद्र खैरनार यांची निवड करण्यात आली.

या वेळी रजक, फरांदे, हिरे यांचीही भाषणे झाली. याप्रसंगी बोरसे यांना "स्व. अशोक राऊत स्मरणार्थ जीवन गौरव' पुरस्काराने राज्यमंत्री भुसे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

अधिवेशनातील ठराव -
- लॉंड्री व्यवसायाला सवलतीच्या दरात वीजपुरवठा द्यावा
- संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी ऋणमोचन भूमीचा तीर्थस्थळाप्रमाणे विकास करावा
- मुंबई-अमरावती एक्‍स्प्रेसला संत गाडगेबाबा यांचे नाव द्यावे
- राज्यातील स्वच्छता अभियानाला संत गाडगे महाराजांचे नाव कायम ठेवावे

Web Title: marathi news nashik news parit society reservation dada bhuse