निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांना पासेस देताना टोलवाटोलवी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

नाशिक - रेल्वेतील निवृत्त कर्मचाऱ्यांना रेल्वेचे कर्मचारी पासेस देताना टाळाटाळ करत असून, पासवाटपाचे काम रेल्वे पेन्शनर्स असोसिएनशला देण्याची मागणी रविवारी (ता. 11) रेल्वे पेन्शनर्स असोसिएशनच्या मेळाव्यात करण्यात आली. 

नाशिक - रेल्वेतील निवृत्त कर्मचाऱ्यांना रेल्वेचे कर्मचारी पासेस देताना टाळाटाळ करत असून, पासवाटपाचे काम रेल्वे पेन्शनर्स असोसिएनशला देण्याची मागणी रविवारी (ता. 11) रेल्वे पेन्शनर्स असोसिएशनच्या मेळाव्यात करण्यात आली. 

रेल्वे पेन्शनर्स असोसिएशनचा 28 वा वार्षिक मेळावा रविवारी समर्थ मंगल कार्यालयात झाला. 1990 पासून ही संघटना जिल्ह्यात कार्यरत असून, सध्या आठशे सभासद आहेत. आजच्या मेळाव्यात निवृत्त कर्मचाऱ्यांनी सवलतीचे पास देताना येणाऱ्या कटू अनुभवाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या खात्यात आमची हयात गेली त्याच खात्यात नवख्या कर्मचाऱ्यांकडून आमचेच काम करताना टाळाटाळ होत असल्याने हे पास वाटपाचे काम संघटनेकडे सोपवावे, असे प्रशासनास सुचविण्यात आले. मेळाव्यात जळगावच्या एस. पी. कुलकर्णी, एस. बी. मेहरूणकर यांनी विविध प्रश्‍नांवर मार्गदर्शन केले. अरुण पाटील यांनी मधुमेहाबाबत मार्गदर्शन केले. वयाची 80 वर्षे झालेले निवृत्त सभासद पी. ई. नांदेडकर, एस. आर. जोशी, डी. एम. पंडित, बी. बी. देशपांडे, शुभांगी जोशी, मुरार, के. जी. दास्ताने यांचा सत्कार झाला. मूळवेतनावरील निवृत्तिवेतनासाठी 15 वर्षांऐवजी बारा वर्षांची अट ठेवावी, वैद्यकीय भत्त्याची रक्‍कम हजार रुपयांऐवजी किमान दीड हजार रुपये मिळावी, असे ठराव करण्यात आले. या वेळी अध्यक्ष व्ही. एन. खालकर, एस. जी. कुलकर्णी, ए. एम. लोमटे यांचे भाषण झाले. एस. बी. मुजुमदार यांनी स्वागत केले. सी. एन. वाडेकर यांनी आभार मानले. बी. व्ही. महाजन यांनी सूत्रसंचालन केले. बरेच जण अनेक वर्षांनी एकमेकांना भेटल्याने जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

Web Title: marathi news nashik news railway