सटाणा येथे प्रजासत्ताक दिनी धाडसी कामगिरी करणाऱ्यांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जानेवारी 2018

सटाणा : देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार (ता.२६) रोजी येथील तहसील कचेरी आवारातील पोलिस कवायत मैदानावर कार्यक्रम संपन्न झाला. सकाळी नऊ वाजता बागलाणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झाले. मुलींनी स्वसंरक्षणासाठी सादर केलेली कराटेची विविध प्रात्यक्षिके व देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम विशेष आकर्षण ठरले.

सटाणा : देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार (ता.२६) रोजी येथील तहसील कचेरी आवारातील पोलिस कवायत मैदानावर कार्यक्रम संपन्न झाला. सकाळी नऊ वाजता बागलाणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झाले. मुलींनी स्वसंरक्षणासाठी सादर केलेली कराटेची विविध प्रात्यक्षिके व देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम विशेष आकर्षण ठरले.

आमदार दीपिका चव्हाण, प्रभारी तहसीलदार प्रशांत पाटील, पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील, न्यायाधीश पी. जी. तापडिया, सहन्यायाधीश विक्रम आव्हाड, नगराध्यक्ष सुनील मोरे, नायब तहसीलदार दीपक धिवरे आदी उपस्थित होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक के. बी. घायवट यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक व शाळा महाविद्यालयांच्या एन. सी. सी. व स्काऊटच्या पथकांनी संचलन केले. नारी सुरक्षा मिशनअंतर्गत कराटेची प्रात्यक्षिके झाली.

ज्युदो कराटेचा वापर करून अडचणीच्या प्रत्येक प्रसंगातून महिला व मुलींना कशाप्रकारे मार्ग काढता येतो, याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षक मुकेश नैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कराटेची विविध प्रात्यक्षिके सादर केली. लोकनेते पं.ध.पाटील मराठा इंग्लिश स्कूल, मनीबाई अग्रवाल प्राथमिक विद्यामंदिर व व्ही.पी.एन. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी उपस्थितानी या कार्यक्रमास विशेष दाद दिली.  

गेल्या वर्षभरात समाजात धाडसी कामगिरी केल्याबद्दल कल्पेश निकम (रुग्णवाहिका चालक, अपघातग्रस्तांना मदत करणे), कारभारी भदाणे (आरई, पोलीस पाटील, पोलीस ठाण्यास सहकार्य), बाळू बिरारी (पोलीसपाटील कंधाणे), कांतीलाल सोनवणे व नंदू सोनवणे (दरोडाप्रकरणी पोलिसांना विशेष मदत) व हिराजी सोनवणे (कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत) यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

यावेळी पालिकेच्या उपनगराध्यक्ष सुवर्णा नंदाळे, पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील, गटनेते दिनकर सोनवणे, काकाजी सोनवणे, नगरसेवक दीपक पाकळे, सुलोचना चव्हाण, सोनाली बैताडे, पुष्पा सूर्यवंशी, सुनिता मोरकर, सुरेखा बच्छाव, आनंदा महाले, लालचंद सोनवणे, दत्तू बैताडे, विनायक बच्छाव, पी.एस.पाटील आदींसह नागरिक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. 

Web Title: Marathi News Nashik News republic day good performance peoples gets honored