उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील वाहन अपघातांत २८ टक्के घट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

येवला : प्रादेशिक परिवहन विभागाने प्रबोधन,जागृती,रिफ्लेक्टरचा वापरासह विविध उपाययोजना केल्याने जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण २८ टक्के घटले आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली.

वाहन चालवतांना गती, वाहनाचा मेंटेनन्स, मोबाईलवर बोलणे आदि गोष्टी स्वयंस्फूर्तीने टाळाव्यात. वाहनांना रिफ्लेक्टर अनिवार्य आहे. वाहनाना रिफ्लेक्टर लावलेले नसतील तर यापुढे कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभाग व येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमाने  बाजार समिती मध्ये शेतीमाल घेवुन येणार्‍या वाहनांचा रात्रीचे वेळेस अपघात होवु नये याकरीता ट्रॅक्टर ट्रॉली, रिक्षा,पिकअप व बौलगाडीला मागील बाजूस रेडीअम रिफ्लेक्टर रिफ्लेक्टर लावण्याचा कार्यक्रमात ते बोलत होते.

जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष ऍड. माणिकराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे,बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे,पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, नगरसेवक प्रविण बनकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भागूनाथ उशीर, मोटार वाहन निरीक्षक सचिन बोधले, सहायक मोटार वाहन निरीक्षक पल्लवी दौड यांची प्रमुख उपस्थिती होती.

अपघात समयी तत्काळ रस्त्यावर जाऊन नेहमी मदत करीत असलेल्या रिजवान शेख, अल्ताफ शेख, रहमान भाई, अंजुम शेख, प्रमोद घाटकर यांचा सत्कार करण्यात आला.सुत्रसंचालन मोहन शेलार व सचिव डी. सी. खौरनार यांनी केले. मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागील बाजूस रेडीअम रिफ्लेक्टर लावण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक किशोर दराडे,उपसभापती गणपत कांदळकर,संतु झांबरे, नवनाथ काळे, कृष्णराव गुंड, भास्कर कोंढरे,कांतीलाल साळवे, गोरख सुराशे,एकनाथ साताळकर, देविदास शेळके, दिपक जगताप,भाऊसाहेब गायकवाड, दामु पवार,शांताराम आव्हाड, शिवाजी धनगे, सुदाम सोनवणे, अशोक शहा, रिजवान शेख,पवन आव्हाड, बाजार समितीचे सचिव डी. सी. खौरनार उपस्थित होते.वाहन निरीक्षक सचिन बोधले यांनी आभार मानले.

Web Title: marathi news Nashik News Road accidents