समृद्धी मार्गासाठी निविदांचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

नाशिक - शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत 56.30 टक्के भूसंपादन करण्यात प्रशासनाला यश आले. त्यामुळे 50 टक्के संपादनानंतर निविदाप्रक्रिया सुरू करण्याचा प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला.

नाशिक - शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत 56.30 टक्के भूसंपादन करण्यात प्रशासनाला यश आले. त्यामुळे 50 टक्के संपादनानंतर निविदाप्रक्रिया सुरू करण्याचा प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला.

शेतकऱ्यांच्या सर्वाधिक विरोधामुळे राज्यात या मार्गासाठी सर्वांत कमी भूसंपादन नाशिक जिल्ह्यात होते. मात्र, आता सरकारी जमिनीसह प्रशासनाने पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक जमिनी संपादनाचा टप्पा ओलांडला. या मार्गासाठी 75 टक्‍क्‍यांपर्यंत जमीन संपादन झाल्यास तेथे प्रत्यक्ष कामही सुरू करता येणार आहे. पन्नास टक्के संपादनानंतर निविदा प्रक्रिया आणि 75 टक्के संपादनानंतर प्रत्यक्ष कामकाज अशा पद्धतीने हे कामकाज पुढे जाणार आहे. त्यानुसार पहिला महत्त्वाचा टप्पा ओलांडण्यात प्रशासनाला यश आले. जिल्ह्यातील दोन्ही तालुक्‍यांत प्रशासनाने आतापर्यंत 97.77 हेक्‍टर वन विभागाची जमीन संपादनात यश मिळविल्याने हे शक्‍य झाले आहे.

627 कोटींचा मोबदला
नाशिक आणि नगर जिल्ह्यांत आतापर्यंत प्रशासनाने 627 कोटी रुपयांचा मोबदला दिला आहे. दोन हजार 845 शेतकऱ्यांकडून एक हजार 54 खरेदीखत नोंदविले आहे. त्यामुळे साधारण 578 क्षेत्रावरील कामकाज पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील 49 पैकी 42 गावांतील कामकाजाला यश आले. नगर जिल्ह्यात 529 शेतकऱ्यांचे 245 खरेदीखत झाले आहे. तेथेही 53 टक्‍क्‍यांहून अधिक जमिनीचे संपादन झाले आहे. त्यामुळे नाशिक विभागात समृद्धीच्या कामाला गती येण्याची शक्‍यता वाढली आहे.

Web Title: marathi news nashik news samruddhi highway tender