लायन्स क्लब ऑफ नाशिक सेन्ट्रल ग्रुपच्या मदतीने शाळेला सोलर सिस्टीम

खंडू मोरे
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

खामखेडा (नाशिक) : जिल्हा परिषदेच्या शाळा डिजीटल करण्यात आल्यानंतर या शाळा ऊर्जेच्या बाबतीतही स्वयंपूर्ण व्हाव्या म्हणून लोकसहभागातून सौरऊर्जा वापराचा जिल्ह्यातला पहिला प्रयत्न फांगदर शाळेने लायन्स क्लब ऑफ नाशिक सेन्ट्रलच्या ग्रुपच्या माध्यमातुन केला आहे. सौरउर्जेवर स्वयंप्रकाशित होण्याचा मान मिळवणारी जिल्ह्यातील ही दुसरीच शाळा ठरली आहे.

खामखेडा (नाशिक) : जिल्हा परिषदेच्या शाळा डिजीटल करण्यात आल्यानंतर या शाळा ऊर्जेच्या बाबतीतही स्वयंपूर्ण व्हाव्या म्हणून लोकसहभागातून सौरऊर्जा वापराचा जिल्ह्यातला पहिला प्रयत्न फांगदर शाळेने लायन्स क्लब ऑफ नाशिक सेन्ट्रलच्या ग्रुपच्या माध्यमातुन केला आहे. सौरउर्जेवर स्वयंप्रकाशित होण्याचा मान मिळवणारी जिल्ह्यातील ही दुसरीच शाळा ठरली आहे.

नाशिक येथील लायन्स क्लब ऑफ नाशिक सेन्ट्रलच्या ग्रुपने आर्थिक मदत करत फांगदर शाळेला सौरशाळेसाठी सौरपॅनल, इनव्हर्टर, बॅटरी किटचे नुकतेच वितरण केले होते. ही सिस्टीम शाळेवर बसवण्यात येऊन नुकतीच कार्यान्वयित देखील झाली आहे. या व्यवस्थेमुळे विजेच्या बाबतीत फांगदर शाळा स्वयंपूर्ण झाली असून फांगदर शाळा जिल्ह्यातील दुसरी सौर उर्जेवर स्वयंप्रकाशित झालेली शाळा ठरली आहे.

फांगदर शाळेचे विविध शैक्षणिक उपक्रम पहात व प्रतिकुल परिस्थिती शाळा विद्यार्थ्यांसाठी देत असलेले योगदान व डिजीटल झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत कायमस्वरूपी विजेची व्यवस्था रहावी यासाठी शाळेने सौरऊर्जा प्रकल्पासाठी लोक सहभागाचे आवाहन केल्यानंतर लायन्स क्लब ऑफ नाशिक सेन्ट्रलच्या ग्रुपने 1 लाख 29 हजारची सौर उर्जा कीट शाळेला पुरवत सामाजिक दातृत्वाचे अनोखे उदाहरण युवकांपुढे ठेवले आहे.

या मदतीने जिल्हा परिषदेची फांगदर ही डिजीटल शाळा आता जिल्ह्यातील दुसरीच सौरशाळा झाली आहे. या शाळेला सौर पॅनेल बसवले गेले असून ही उर्जा बॅटरीत साठवून शालेय वेळेत वीज वापरता येत आहे. यामुळे शाळेत असलेले चार संगणक, प्रोजेक्टर, प्रिंटर ,स्मार्ट बोर्ड, इम्प्लीफायर, साउंड सिस्टम या यंत्रणेवर शालेय वेळेत सतत चालणार आहे.

लायन्स क्लब ऑफ नाशिक सेंट्रलचे अध्यक्ष महेश पितृभक्त, सचिव दत्तात्रेय शिनकर, कोषाध्यक्ष अमोल सोनजे, भूषण कोठावदे, विनोद सोनजे, विनोद कोठावदे, किशोर शिरुडे, रवींद्र सोनजे, हर्षद चिंचोरे, सचिन वाघमारे, अभिजित पाचपुते, राहुल अमृतकर, श्रीकांत अमृतकर, हितेश देव, सागर लोखंडे, संजय पिंगळे, विनोद बोरसे, चंदू बोरसे, तुषार अमृतकर योगेश भामरे, संजय दुसे, योगेश नेरकर, अश्विन पवार, राहुल सैंदाने, भूषण ब्राम्हणकार, किरण नेरकर, आशिष येवले, गणेश येवले आदि युवकांनी फांगदर शाळेला दिलेली उर्जारूपी मदत जिल्ह्याभरातील युवकांच्या, सामाजिक मंडळे, प्रतिष्ठानापुढे आदर्श घालून देणारी आहे. 

लायन्स क्लब ऑफ नाशिक सेन्ट्रलच्या ग्रुपने नाशिक पासून १०० किमी अंतरावरील आदिवासी वस्तीवरील शाळेस सोलर सिस्टीम देत विजेच्या बाबतीत शाळा स्वयंप्रकाशित केल्याने जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ वैशाली झनकर, गटविकास अधि महेश पाटील, गटशिक्षणाधिकारी एस एस बच्छाव, सतिश बच्छाव, नंदू देवरे, विजया फलके, शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष सद्ष्य, सरपंच उखड्याबाई पवार, उपसरपंच बापू शेवाळे, मुख्याध्यापक आनंदा पवार व खंडू मोरे यांनी ग्रुपचे आभार व्यक्त केले.
 

Web Title: Marathi news nashik news solar panel gifted to school lions club of nashik