स्ट्रॉबेरीचा हंगाम वाढत्या थंडी बरोबरच बहरला

दिगंबर पाटोळे
बुधवार, 10 जानेवारी 2018

वणी (नाशिक) : लाल, गुलाबी रंगाची, गोड, आंबट चवीची स्ट्रॉबेरी म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा स्ट्रॉबेरीचा हंगाम वाढत्या थंडी बरोबरच बहरला असून लालचुटूक आरोग्यदायी स्ट्रॉबेरी सप्तश्रृंगी गड, वणी-सापूतारा रस्त्यावर ठिकठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. 

वणी (नाशिक) : लाल, गुलाबी रंगाची, गोड, आंबट चवीची स्ट्रॉबेरी म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा स्ट्रॉबेरीचा हंगाम वाढत्या थंडी बरोबरच बहरला असून लालचुटूक आरोग्यदायी स्ट्रॉबेरी सप्तश्रृंगी गड, वणी-सापूतारा रस्त्यावर ठिकठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. 

जगभरातील स्ट्रॅाबेरी उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाबळेश्वर बरोबरच नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण तालुक्यातील घाटमाथ्यावर लालमातीत पिकणारी लालभडक, लहान मोठी, आंबटगोड अशी स्ट्रॉबेरीची फळे वणी, सप्तश्रृंगी गड व सापुतारा रस्यावर मोठ्या प्रमात विक्रीसाठी दाखल झाली असून रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या भाविक व पर्यटकांना मोहीत करीत आहे. 

सुरगाणा तालुक्यातील प्रामुख्याने घाटमाथ्यावरील नागशेवडी, घोडांबे, पोहाळी, सराड, चिखली, शिंदे, हतगड, बोरगांव, घागबारी, लिंगामा आदी भागात तर कळवण तालुक्याच्या पश्चिम भागातील पळसदरचे खोरे, सुकापूर, देवळी कराड, खेकुडे, बोरदैवत, वडापाडा आदी गावांतील आदिवासी शेतकरी शेतकरी भात, नागली, मका, भुईमूग, कुळीद, उडीद, दादर, गहू या पारंपरिक पिकांसह आता शास्त्रशुद्ध पद्धतीने स्ट्रॉबेरीची बाग लावत आहे. या भागात स्ट्रॉबेरीच्या पिकासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण, जमिनीची पोत यामुळे याभागात सात आठ वर्षांपासून स्ट्रॉबेरी लागवडीचे प्रयोग यशस्वी होऊ लागल्याने या भागात दिवसेंदिवस स्ट्रॉबेरीच्या लागवडीचे क्षेत्र वाढतच आहे. त्यामुळे या परिसरात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न मोठय़ा प्रमाणावर होऊ लागले आहे. त्यामुळे या परिसरात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न मोठय़ा प्रमाणावर होऊ लागले आहे. विंटर, एसए कॅमेर ओझा, नादीला, आर 2, आर 1, तसेच स्वीट चार्ली आदी प्रकारच्या स्ट्रॉबेरीचे वाण असले तरी या भागात सेल्वा, राणी, इंटर, नाभीया यांसह कमी दिवसात लालभडक मोठे फळ देणाऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. या वाणांची रोपे येथील आदिवासी शेतकरी प्रामुख्याने महाबळेश्वर येथून १५ ते २५ रुपयास एक रोप या दराने आणतात. 

नगदी पिक असलेल्या स्ट्रॉबेरीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या हातात थोडय़ाफार प्रमाणात पैसा खेळू लागला आहे. मोठे शेतकरी हे एक किलो, दोन किलोचे खोके भरून मुंबई, सुरत, नवसारी, बिल्लीमोरा, वघई, भरूच, वाझदा येथे पाठवले जातात. तर काही शेतकरी जागेवरच परिसरातील व्यवसायिकांना स्ट्रॉबेरीची विक्री करातात. बहुतांशी शेतकरी हे स्व:ताच स्ट्रॉबेरी पाटी किंवा खोक्यात भरुन वणी, नांदुरी, सप्तश्रृंगी गड, सापुतारा रस्त्यांवरही ठिकठिकाणी छोटे-छोटे स्टॉल उभारुन स्ट्रॉबेरी विकताना दिसत आहे. स्ट्रॉबेरी विक्रीतून अनेकांना यापासून रोजगार उपलब्ध झाला आहे.

थंडी ठरतेय उपयुक्त

स्ट्रॉबेरी हे थंडीत पिकणारे फळ असल्याने त्याचा मुख्य बहर डिसेंबर, जानेवारी महिन्यांत असतो. स्ट्रॉबेरीचे एकूण सहा बहर मिळतात. सध्या बहुतांशी शेतकऱ्यांचा दुसरा बहर सुरू आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यांत सर्वाधिक स्ट्रॉबेरी बाजारात विक्रीसाठी येते. सध्या थंडीचे प्रमाण चांगले असल्यामुळे ते स्ट्रॉबेरी पिकास उपयुक्त ठरत आहे. सध्या स्ट्रॉबेरी आकाराने मोठी व चवीला उत्तम असल्याने त्यास मागणी चांगली आहे.

आरोग्यदायी स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी सेवणामुळे हृद्यविकार आणि मधुमेहावर मात करता येते. 

स्ट्रॉबेरीमध्ये ‘क’ जीवनसत्व मोठ्याप्रमाणात असल्यामुळे दिवसभराच्या कामामुळे येणारा थकवा कमी होतो. डोळ्यांना प्रखर प्रकाशापासून दिलासा मिळतो. त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या कमी करते. त्यामुळे त्वचा तजेलदार होते.

स्ट्रॉबेरीत असणारे अँटीऑक्‍सीडेंट, फ्लेवोनॉइड, फोलेट आणि केंफेरॉल ही तत्व कॅन्सर होण्यास कारणीभूत असणाऱ्या पेशी नष्ट करतात. तांबड्या रक्तपेशींची वाढ करण्यास मदत करतात. स्ट्रॉबेरी मेदरहीत असल्याने वजनावर नियंत्रण मिळवण्यास फायदा होतो.

 

Web Title: Marathi news nashik news strawberries