नाशिक - बागलाण तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

रोशन भामरे  
शुक्रवार, 9 मार्च 2018

तळवाडे दिगर (नाशिक) : बागलाण तालुक्यात आज शुक्रवार (ता. ९) रोजी सायंकाळी वादळी वारा व विजांच्या कडकडात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील शेतकऱ्यांवर यंदा पुन्हा निसर्गाची अवकृपा झाली असून तळवाडे दिगर, मोरकुरे, पठावे, चिंचपाडा या परिसरातील पाऊसामुळे कांदा, भाजीपाल्यासह रब्बीतील पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बळीराजा अस्मानी संकटात सापडला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातवरणासह बुधवारी व गुरुवारी एक ते पाच मिनिट रिमझिम पाऊस झाल्याने बळीराजा आधीच धास्तावला असताना आज शुक्रवारी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज शुक्रवारी (ता.९) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे परीसरातील शेतांमध्ये काढून ठेवलेला कांदा, गहू, हरभरा आदी पिके आवरण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली.

या अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंब्याचे मोहोर गळून पडले असून याचा थेट परिणाम कैरी व आंब्याच्या उत्पादनावर होणार आहे. तर या अवकाळी पावसामुळे कांदा, टोमटो, गहू, हरभरा यांच्यासह भाजीपाला पिकाच्या उत्पादनावर परिमाण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिसरातील काही गावात कांद्याची तसेच रब्बी पिकांची काढणी सुरु होती तर अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली. कांदा पिक मोसमांत आलेले असल्यामुळे गेल्या तीन दिवसापासूनचे ढगाळ वातावरण व आजच्या पावसामुळे कांद्यासह भाजीपाला पिकावर रोगांचा प्रादुर्भाव तसेच त्यांचे उत्पन्न घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या तीन दिवसापासून परिसरात ढगाळ वातावरण होते. तसेच बुधवार,गुरुवारी एक ते पाच मिटीत रिमझिम पाऊस पडला त्यामुळे कांद्यासह भाजीपाला पिकावर करपा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकऱ्याना महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. चालू वर्षी खराब झालेल्या कांदा रोपामुळे उशिरा लागवड केलेल्या कांदा पिकावर करपा व भूरीने थैमान घातले आहे.

Web Title: Marathi news nashik news tal baglan hailstorm