नाशिकमध्ये बुधवारी रात्री तीन खून

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

पहिली घटना रात्री साडेनऊ वाजता अंबडमधील रिक्षाचालक साहेबराव जाधव याच्यासोबत घडली. साहेबरावावरील हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. दुसरी घटना इंदिरानगरजवळील राजीवनगर झोपडपट्टी परिसरात शंभरफुटी रस्त्यावर झाली.

नाशिक : शहरात बुधवारी रात्री साडेआठ वाजता अंबडमधील साहेबराव जाधव या रिक्षाचालकाच्या खुनानंतर इंदिरानगरजवळील राजीवनगर झोपडपत्तीलगत जुन्या वादातून दोघांचा खून करण्यात आला. यापैकी एक सिडकोतील गणेशनगर तर दुसरा राजीवनगर झोपडपट्टीतील आहे. या दोघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

पहिली घटना रात्री साडेनऊ वाजता अंबडमधील रिक्षाचालक साहेबराव जाधव याच्यासोबत घडली. साहेबरावावरील हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. दुसरी घटना इंदिरानगरजवळील राजीवनगर झोपडपट्टी परिसरात शंभरफुटी रस्त्यावर झाली. जुन्या भांडणाची कुरापत काढत अज्ञात संशयितांनी धारदार हत्याराने दोघांवर हल्ला केला. यात देविदास इगे व दिनेश नीलकंठ बिरासदर यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Marathi news Nashik news three murder in Nashik