३५ क्रेट टोमॅटो विक्रीतून मिळाले अवघे १७३ रुपये 

रोशन भामरे 
बुधवार, 14 मार्च 2018

तळवाडे दिगर (नाशिक) : सध्या टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून टोमॅटो आता २ ते ३ रुपये किलो इतका घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे. रोजच्या जेवणात महत्वाचे स्थान असणार्‍या टोमॅटोचे भाव घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी टोमॅटा पिकाला सुरूवातीपासूनच चांगला भाव नाही. संपूर्ण हंगामभर भावाची घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक अडचणीत आला आहे. व्यापारी टोमॅटो उत्पादकास बाजारात २० किलो टोमॅटोच्या क्रेटला प्रतवारीनुसार ४० ते ५० रूपये दर देत असल्यान शेतकर्‍यांना मजूरीचे पैसेही हातात येत नाही.

तळवाडे दिगर येथील एका शेतकऱ्याने ३५ (जाळी) क्रेट टोमॅटो सुरत येथे पाठवला असता त्यांच्या हातात अवघे १७३ रुपये मिळाले असून त्यात फक्त गाडी भाडेच निघाले असून तोडणीचा खर्च देखील घरातून भरण्याची वेळ त्याच्यावर आली असून सुरत येथे पाठवण्यासाठी प्रती क्यारेत ४७ रुपये भाडे, ५० रुपये हमाली, तोलाई हमाली ९५ गेली असता हातात अवघे १७३ रुपये आल्याने शेतकरी अवघा हवालदिल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकावर टाँकट्टर फिरवायला सुरुवात केली आहे.

टोमॅटो पिकासाठी एकरी एक लाख ते सव्वालाख रुपये खर्च करून हातात एक रुपया पण पडत नसून उलट घरातू पैसे घालण्याची वेळ उत्पादक शेतकरी वर्गावर आलेली आहे. टोमॅटोसाठी शेतीची मशागत, ठिबक, मल्चिंग पेपर, खत, औषध, मंडपासाठी तार, बांबू, सुतळी, बांधणी, तोडणी (काढणी) मजुरी आदी खर्चाचा विचार केला तर एकरी लाख रुपये खर्च करून दहा हजार रुपये मिळणे देखील शेतकऱ्यांना कठीण झाले आहे.

शेतकर्‍याचा माल शेतात तयार झाल्यावर सुध्दा तो व्यापारी वर्ग बाजारात आणण्यासाठी तोडणी, क्रेट भरणे, वाहतुक यासर्व बाबींचा खर्च शेतकर्‍यास करावा लागतो. त्यामुळे उत्पादनासाठी लागलेला खर्च व उत्पादनानंतर येणारा खर्च यांची गोळा बेरीज केली तर आजच्या भावात उत्पादक शेतकर्‍यास टोमॅटो पीक न परवडण्यासाखे आहे. चालूवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने वरील नगदी पिकांवर शेतकर्‍यांची मदार जास्त होती. पण भावामुळे शेतकर्‍यांची ही अशा सुध्दा फोल ठरली. टोमॅटो या नगदी पिकास भाव मिळेल हे स्वप्न भंगले. टोमॅटो हे पीक नासवंत आहे. त्यामुळे मालाचासाठा सुध्दा करता येत नाही. माल सडू नये, म्हणून मिळालेल्या भावात शेतकरी आपला माल कमिशन एजंटकडे विकतांना दिसत आहे. ढगाळ हवामानामुळे लवकर पक्व होणारी फळे, सद्या टोमॅटोची मागणी कमी झाली.

नाशिक जिल्ह्यात टोमॅटोच्या लागवडीखाली क्षेत्रात वाढ झाली आहे. चांगली मागणी आणि चांगले उत्पादन देणार्‍या या पिकाचा यंदा मात्र चांगला दर मिळाला नाही. तसेच चालू वर्षी दर महिन्यात होणाऱ्या हवामान बदलामुळे पिकाच्या वाढीसाठीचे पोषक वातावरण उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना वेगवेगळ्या फवारण्या कराव्या लागत आहे. त्यामुळे अनेक अडचणींना तोंड देत शेतकर्‍यांनी टोमॅटो उत्पादन घेतले. मात्र, बाजारापर्यंत माल नेण्याचा  उत्पादनखर्च निघणेही अवघड झाले.

“चालू वर्षी गेल्या दोन हंगामापासून टोमॅटो पिकाचा उत्पादन खर्च निघणे देखील अवघड झाला असून सध्या तर २ ते ४ रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्यामुळे घरातून पैसे टाकण्याची वेळ आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकावर रोटर फिरवायला सुरुवात केली आहे, असे शेतकरी गणेश रौदळ यांनी सांगितले. 

सध्या टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळत असून टोमॅटो उत्पादक शेतकरी देशोधाडीला लागला असून लाख रुपये खर्च करून दहा हजार रुपये हातात मिळणे देखील कठीण झाले असून सद्या सर्वच भाजीपाला पिकाची अशीच अवस्था असल्यामुळे शेतकऱ्यांनी पिक घ्यावे तरी काय हि चिंता लागली आहे, असे टोमॅटो उत्पादक शेतकरी अप्पा आहिरे यांनी सांगितले. 

Web Title: Marathi news nashik news tomato farmers