वृक्षलागवडीसाठी वन विभागाकडून तयारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

नाशिक - जुलै महिन्यात शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या 13 कोटी वृक्षलागवडीसंदर्भात वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी नाशिक विभागाचा आढावा घेत आवश्‍यक सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

नाशिक - जुलै महिन्यात शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या 13 कोटी वृक्षलागवडीसंदर्भात वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी नाशिक विभागाचा आढावा घेत आवश्‍यक सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

राज्यातील हरित क्षेत्रामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने राज्यात राज्य शासनाकडून तीन वर्षांत 50 कोटी वृक्षलागवडीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 13 कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. यासंदर्भात आढावा घेण्यासाठी नाशिक येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी 13 कोटी वृक्षलागवडीसंदर्भात विविध जिल्ह्यांतील क्षेत्र, रोपांची उपलब्धता, मागील वृक्षलागवडीतील जिवंत रोपांची टक्केवारी, खोदलेले खड्डे, आवश्‍यक रोपे तसेच, ग्रीन आर्मी, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, पर्यावरणप्रेमी यांच्यासोबत असलेला अधिकाऱ्यांचा सहभाग आणि त्यांनी केलेले नियोजन आदींची सद्यःस्थिती जाणून घेण्यात आली.

Web Title: marathi news nashik news tree plantation forest department