शिक्षणमंत्री बनले विद्यार्थ्यांचे मित्र; विद्यार्थ्यांशी साधला संवाद

खंडू मोरे
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

देवेंद्र वाघ रामायेसुपाडा व शितल बावणे हट्टी ता चांदवड या गावातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट मुंबई येथे आयोजित केली होती. या भेटी दरम्यान विध्यार्थ्यांना हवाई,जलमार्ग व रेल्वे मार्गाची सफर देखील शिक्षकांना घडवून आणली. विद्यार्थ्यांना दिलेल्या या हटके अनुभवाचे शिक्षण मंत्र्यांनी कौतुक करत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

खामखेडा (नाशिक) : हट्टी व रामायेसुपाडा ता चांदवड येथील जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यानी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेत चर्चा केली. शिक्षणमंत्र्यांनी या अकरा विदयार्थ्यांशी संवाद साधत या भेटीचे सोशियाल माध्यमात ट्विट करत कौतुक केले.

देवेंद्र वाघ रामायेसुपाडा व शितल बावणे हट्टी ता चांदवड या गावातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट मुंबई येथे आयोजित केली होती. या भेटी दरम्यान विध्यार्थ्यांना हवाई,जलमार्ग व रेल्वे मार्गाची सफर देखील शिक्षकांना घडवून आणली. विद्यार्थ्यांना दिलेल्या या हटके अनुभवाचे शिक्षण मंत्र्यांनी कौतुक करत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

या भेटी दरम्यान दोघा शिक्षकांनी आपापल्या शाळेतील विध्यार्थ्यांच्या मुंबई क्षेत्रभेटीचे व शाळेतील विध्यार्थ्यांना रस्ते, रेल्वे, हवाई व जलवाहतूक मार्गाने अनुभव देण्याचे नियोजन केले होते. विद्यार्थ्यांना शाळेच्या गावापासुन बसने मनमाड, मनमाडहून रेल्वेने शिर्डी व विमानाने शिर्डीहून मुंबई व मुंबईत जलमार्गाने जहाजातून विद्यार्थ्यांना सफर घडवून आणली.

मुंबईत गेल्यावर विद्यार्थ्यांना मंत्रालय दाखवत शिक्षण मंत्र्यांशी भेट घडवून आणली. या भेटीत शिक्षण मंत्र्यांनी विध्यार्थ्यांशी संवाद साधला. तावडे यांचे टाळ्या वाजवून केले. विद्यार्थ्यांशी संपर्क साधताना त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळे पणाने संवाद साधला. विद्यार्थ्यांशी बोलताना,शिक्षणाबाबत त्यांनी मते जाणून घेतली. विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयावर प्रश्न विचारण्याची परवानगी यावेळी त्यांनी दिली. मी येथे तुमचा एक मित्र म्हणून आणि एक शिक्षक म्हणून आहे. एका मुलीने मला शेतकरी व्हायचे या उत्तरावर मंत्र्यांनी तिचे विशेष कौतुक केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी सुद्धा शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या सूचना पाळून त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले.

विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांवर उत्तरे दिली.विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक बुद्धी आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिकांवर आधारीत ज्ञान विद्यार्थ्यांना देण्याच्या या कृतीचे शिक्षकांचे कौतुक देखील त्यांनी केले. या भेटीत गौरव बागुल, विशाल बागुल, हर्षल भोये, अपुर्वा परदेशी, पायल परदेशी, वेदांत परदेशी, श्रृती परदेशी, पुष्प राज परदेशी, साक्षी परदेशी, अंकीता परदेशी, अथर्व वाघ आदि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या शाळेच्या चमूला शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झणकर, गटशिक्षणाधिकारी बी. टी. चव्हाण व ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.

या शालेय भेटीचे शिक्षण मंत्र्यांनी स्वतः ट्विटरवर फोटो माहिती प्रसारित करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Web Title: Marathi news Nashik news Vinod Tawde meet students