नाशिकच्या वायनरीने जर्मनीचे शिष्टमंडळ प्रभावित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

नाशिक - जर्मनीतील वाइन उत्पादक आणि वाइन प्रक्रियेच्या अभ्यासकांनी रविवारी (ता. 4) येथील विविध वायनरींना भेट देत व्यवसायाच्या संधी जाणून घेतल्या. देशातील वाइन कॅपिटल म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये वाइन निर्मितीची प्रक्रिया या शिष्टमंडळाने जाणून घेतली. या दौऱ्यामुळे वाइन निर्मितीच्या तंत्राचे आदानप्रदान होऊन त्याचा फायदा वाइन उद्योगाला होणार आहे.

जर्मनीच्या शिष्टमंडळाने स्टुडगार्ड मीट यांच्या माध्यमातून नाशिकच्या वायनरींना भेट देण्याची इच्छा व्यक्‍त केली होती. त्यानुसार रविवारचा दौरा घेण्यात आला होता. प्रारंभी सोमा, यॉर्क व नंतर सुला विनियार्डस्‌ येथे भेट देत शिष्टमंडळाने वाइन निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली.

भारतात वाइनच्या बाजारपेठेचा होत असलेला विकास याबाबत त्यांनी माहिती घेतली. जर्मनीतील ब्रॅंड, तसेच भारतातील प्रसिद्ध ब्रॅंड याबाबतही त्यांनी तुलनात्मक माहिती दिली. जर्मनीतील बाजारपेठेत भारतीय वाइन ब्रॅंडला असलेल्या संधीबाबतही त्यांनी नाशिकच्या वायनरींना भेट दिली. काही ब्रॅंड संयुक्तपणे वितरणाची संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे, ऑल इंडिया वाइन प्रोड्युसर्स असोसिएशनचे माजी सचिव राजेश जाधव, सचिव राजेश बोरसे, सागर वझरे, मुंबईचे तेजल दिवटे, नाशिकचे जगदीश होळकर, प्रदीप पाचपाटील, कैलास गुरुनानी, रवी गुरुनानी, अजिंक्‍य पावस्कर आदी उपस्थित होते.

Web Title: marathi news nashik news winery german delegation