"ट्रेजर हंट'मधून महिलांनी लुटला आनंद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

नाशिक - सायकलवर स्वार होताना, विविध कोडे सोडविताना अंतिम ध्येयापर्यंत पोचण्यासाठी महिलांमधील बौद्धिक क्षमतेसह धाडसाची कसोटी शनिवारी (ता. 10) पाहायला मिळाली. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन व एसएसके सॉलिटिअरतर्फे महिला दिनानिमित्त "ट्रेजर हंट' उपक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. "धाडसी बना, आनंदी राहा, उत्कृष्ट बना', असा नारा देत महिलांनी रॅली पूर्ण केली. 

सलग तिसऱ्या वर्षी झालेल्या या रॅलीत दोनशेहून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला. महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनिता सिंगल, नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक प्रतिभा भदाणे, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार, मैथिली बोरसे आदी सहभागी झाल्या. कार्यक्रमादरम्यान उत्तुंग कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. 

रॅलीदरम्यान विशेष वेशभूषा, उत्कृष्ट सायकल सजावट करणाऱ्या महिलांचा विशेष पारितोषिक देऊन सत्कार झाला. विशेष वेशभूषेचे पहिले पारितोषिक आर्या सुर्वे, द्वितीय- डॉ. स्वाती करकरे, तर तृतीय पारितोषिक शुभांगी सांगळे यांना मिळाले. 15 ते 20 उत्कृष्ट सजावट केलेल्या सायकलींमधून पहिला क्रमांक सोनाली सुर्वे यांनी मिळविला. द्वितीय- गौरी कसात, तर शिया लालवाणी हिने तृतीय बक्षीस जिंकले. सोडतीत पोलिस खात्यातील किशोरी देशपांडे यांना सायकल मिळाली. 

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, शैलेश कुटे, नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, सचिव नितीन भोसले, उपाध्यक्ष योगेश शिंदे, वैभव शेटे, मार्गदर्शक शैलेश राजहंस आदी सदस्य उपस्थित होते. नाशिक सायकलिस्टतर्फे महिला सक्षमीकरणाचा एक भाग म्हणून सायकल ट्रेजर हंटचे नियोजन नीता नारंग, सोफिया कपाडिया आदींनी केले. 

यांचा झाला सन्मान 
रविजा सिंगल (भारताची सर्वांत तरुण अर्ध आयर्नमॅन), माधुरी कांगणे (पोलिस उपायुक्त), रंगोली कुटे (तरुण महिला उद्योजक), सोनाली सुर्वे (एनआरएमची सुवर्णपदकविजेती), डॉ. मनीषा रौंदळ (फिटनेसबद्दल आग्रही व्यक्तिमत्त्व) यांच्यासह नऊवर्षीय नियती अग्रवालचा ट्रेजर हंटमध्ये सहभागाबद्दल गौरव करण्यात आला. 

Web Title: marathi news nashik news women Treasure Hunt