नाशिकमध्ये पावसामुळे विसर्ग सुरु अन दुष्काळाने टॅकरही 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

नाशिक ः उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाने पाच दिवसांपासून प्रमुख धरण समूहातून मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यासाठी विसर्गही सुरु आहे. त्याचवेळी दुसरीकडे अनेक तालुके अजूनही कोरडेठाक असून तेथे 3247 गाव-वाड्यातील 13 लाखांहून आधिक लोकसंख्येला 672 टॅकरने पाणीपुरवठा सुरु असल्याचे परस्पर विसंगत चित्रही उत्तर महाराष्ट्रात आहे. 

नाशिक जिल्ह्यात प्रमुख धरण समूहातून पाच दिवसांपासून सातत्याने जायकवाडीसाठी पाण्याचा विसर्ग सुरु असला तरी, दुष्काळी भागात मात्र पाण्याच्या टॅकरनेच पाणीपुरवठा 
सुरु आहे. एका बाजूला 18 धरणात 70 टक्केहून आधिक पाणीसाठा आहे. आळंदी, भावली, वाघाड ओझरखेड वालदेवी, भोजापूर, केळझर अशी 9 धरण शंभर टक्के फूल 
आहेत. गंगापूर,दारणा, करंजवण मुकणे ही प्रमुख 90 टक्केहून आधिक फूल झाली आहेत

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nashik rain