नाशिक रोड न्यायालय इमारतीचा शनिवारी कोनशीला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

नाशिकः नाशिक रोड येथील फौजदारी व दिवाणी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशीला अनावरण येत्या शनिवारी (ता.28) मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय रणजीत मोरे यांच्या हस्ते सकाळी अकराला होणार आहे. प्रमुख पाहूणे म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 
नाशिकचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश सुर्यकांत शिंदे असतील. 

असे असेल न्यायालय 
नाशिक रोड पोलिस ठाण्यालगत पूर्वीच्या डिस्ट्रीलरी क्वाटर्स परिसरात 3 एकर जागेवर न्यायालयाची नवीन इमारत होणार आहे. इमारतीसाठी साडे 12 कोटीचा निधीला मंजूरी मिळाली आहे. इमारतीच्या बांधकाम निविदा निघून प्रत्यक्ष कामकाज सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यात 2 मजल्यांच्या इमारतीला मान्यता असून भविष्यात न्यायालयाच्या गरजेनुसार 4 मजल्यापर्यत विस्ताराची बांधकाम आराखड्यात तजवीज ठेवली आहे. इमारतीत पार्कींग, वकील कक्ष, बेलीफ कक्ष, सरकारी वकीलांचा कक्षासह अद्यावत 
सुविधा असतील. दिड वर्षात इमारत पूर्णत्वास येईल. असा अंदाज आहे. 
 
9 वर्षापासून नाशिक रोड वकील संघाचा पाठपुरावा सुरु होता. माजी मंत्री अजित पवार, दत्ता गायकवाड, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार बाळासाहेब सानप यांच्यापासून तर बार असोसिएशनच्या सदस्यापर्यत सगळ्याच्या प्रयत्नामुळे हे शक्‍य झाले. 
-ऍड सुदाम गायकवाड (अध्यक्ष ना.रोड वकील संघ) 

Web Title: marathi news nashik road court