नाशिकच्या 'सुला फेस्ट 2018' मध्ये देश-विदेशातील संगीत प्रेमींची हजेरी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

नाशिक - सुला विनियार्डसच्या निसर्गरम्य वातावरणात थिरकायला लावणारे संगीत अन्‌ त्याच्या जोडीला लज्जतदार खाद्यपदार्थ अशा उत्साहवर्धक वातावरणात 'सुला फेस्ट-2018' या अकराव्या हंगामाला शनिवारी (ता. 3) सुरवात झाली. सायंकाळी सूर्य मावळत असताना अन्‌ वातावरणात गारवा निर्माण होत असताना 'पॅरोव्ह स्टेलर', तर रात्री उशिरा 'क्रिस्टल फायटर्स' बॅंडच्या सादरीकरणाने उपस्थितांना थिरकण्याचा मोह आवरला नाही. गच्च भरलेल्या ऍम्फिथिएटर परिसराचे दृश्‍य उत्साह वाढविणारे होते. आज (ता.

नाशिक - सुला विनियार्डसच्या निसर्गरम्य वातावरणात थिरकायला लावणारे संगीत अन्‌ त्याच्या जोडीला लज्जतदार खाद्यपदार्थ अशा उत्साहवर्धक वातावरणात 'सुला फेस्ट-2018' या अकराव्या हंगामाला शनिवारी (ता. 3) सुरवात झाली. सायंकाळी सूर्य मावळत असताना अन्‌ वातावरणात गारवा निर्माण होत असताना 'पॅरोव्ह स्टेलर', तर रात्री उशिरा 'क्रिस्टल फायटर्स' बॅंडच्या सादरीकरणाने उपस्थितांना थिरकण्याचा मोह आवरला नाही. गच्च भरलेल्या ऍम्फिथिएटर परिसराचे दृश्‍य उत्साह वाढविणारे होते. आज (ता. 4) सायंकाळी प्रसिद्ध संगीतकार अमित त्रिवेदी यांचे सादरीकरण लक्षवेधी ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या बँडने 'सुला फेस्ट-2018'ची धमाकेदार सुरवात झाली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), बीएसएनएल यांच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात सुला विनियार्डसच्या प्रांगणात सकाळपासून देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांनी गर्दी करायला सुरवात केली होती. काल दुपारच्या वेळी प्रांगणातील स्टॉल्सवर खरेदीसाठी महिला, युवतींची गर्दी झाली होती. मन मोहणाऱ्या ड्रेसेसपासून तर पर्स व अन्य शोभेच्या वस्तू, हॅट विक्रीसाठी उपलब्ध होत्या. 
SulaFest

'सुला फेस्ट'मध्ये किवीस्टार, रन पुसी रन, ग्रेन यांचे सादरीकरण झाले. सूर्य जसजसा मावळतीला जात होता तसतसा तरुणाईमधील उत्साह वाढत गेला. 'जिप्सी हिल'च्या सादरीकरणानंतर नृत्य करण्यासाठी गर्दी होऊ लागली. यानंतर ऑस्ट्रियाच्या 'पॅरोव्ह स्टेलर'च्या सादरीकरणाच्या वेळी ऍम्फिथिएटर गच्च भरले होते. 'क्रिस्टल फायटर्स'च्या सादरीकरणाच्या प्रतीक्षेत गर्दी व्हायला सुरवात होत होती. रात्री नऊला 'क्रिस्टल फायटर्स'कडून सादरीकरणाला सुरवात होताच युवक-युवतींमध्ये उत्साह संचारला होता. 'फेस्ट'ला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे घोषणाबाजी करत विरोध दर्शविण्यात आला. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले. 
SulaFestSulaFest

SulaFest

SulaFest
SulaFest

Web Title: marathi news nashik sula fest 2018 music band foreigners