नाकाबंदीत चोरीच्या दुचाकी-कट्ट्यासह दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

नाशिक - जुना गंगापूर नाका येथील व्ही. एन. नाईक महाविद्यालय रस्त्यावर पोलिसांकडून नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी सुरु असताना, दोघांकडून चोरीची दुचाकी व गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अंबड पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. सरकारवाडा पोलिसांनी दोघांना अटक केली. आज (ता. 4) न्यायालयात हजर केले असता, त्यांना मंगळवारपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

चेतन आनंदा ठमके (19, रा. नवजीवन डे स्कूल, त्रिमूर्ती चौक, सिडको), पंकज विनोद आहेर (18, रा. शिवशक्ती चौक, साईबाबा मंदिरासमोर, त्रिमूर्तीचौक, सिडको) असे दोघा संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सरकारवाडा पोलिसांनी हद्दीत असलेल्या व्ही. एन. नाईक महाविद्यालयाजवळ नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी सुरू केली होती. यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी भालेराव यांनी संशयित चेतन ठमके, पंकज आहेर यांना दोघांच्या दुचाकीला अडविले आणि त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. दुचाकीचे कागदपत्रे नसल्याने त्यांना बाजुला घेतले असता, त्यांच्या संशयास्पद हालचालीवरुन पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली. चेतन ठमके याच्याकडे एक गावठी कट्टा सापडला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत सरकारवाडा पोलिसात आणले. पोलिसी खाक्‍या दाखविला असता त्यांनी दुचाकीही चोरीची असल्याचे सांगितले. दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले. दोघांच्या विरोधात अंबड पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. आज (ता. 4) दुपारी दोघा संशयितांना न्यायालयासमोर हजर केले गेले. त्यांना येत्या मंगळवारपर्यंत (ता. 6) दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल असून सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी भालेराव हे तपास करीत आहेत. 

Web Title: marathi news nashik two thief arrested with two wheeler