#BattleForNashik-नाशिककरांची "मन की बात' मनातच  ... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

  नाशिक, : प्रत्येक निवडणुकीत लाटेवर स्वार होणाऱ्या नाशिककरांचा यंदाचा कौल कोणाकडे राहील, याचा अंदाज वर्तविण्यात राजकीय धुरंधर कमी पडत असून, नाशिककरांच्या मनात यंदाचा खासदार कोण, याबाबत "मन की बात' समजत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे छातीठोकपणे हाच उमेदवार निवडून येईल, असा दावा करणाऱ्यांकडूनही दावे- प्रतिदावे बंद झाल्याचे नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांत दिसून येते. 

  नाशिक, : प्रत्येक निवडणुकीत लाटेवर स्वार होणाऱ्या नाशिककरांचा यंदाचा कौल कोणाकडे राहील, याचा अंदाज वर्तविण्यात राजकीय धुरंधर कमी पडत असून, नाशिककरांच्या मनात यंदाचा खासदार कोण, याबाबत "मन की बात' समजत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे छातीठोकपणे हाच उमेदवार निवडून येईल, असा दावा करणाऱ्यांकडूनही दावे- प्रतिदावे बंद झाल्याचे नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांत दिसून येते. 

   नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोचला असतानादेखील नाशिककरांचा कौल अद्याप दिसून येत नाही. व्हॉट्‌सऍप किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ठराविक उमेदवार निवडून येईल असा दावा केला जात असला, तरी ग्राउंड लेव्हलवर मात्र वेगळेच चित्र दिसत असल्याने उमेदवारांचे कार्यकर्ते धास्तावले आहेत. काही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असला, तरी विरोधी पक्षांकडून पडद्यामागच्या खेळ्यांशिवाय मतदार खुलेआम मत व्यक्त करण्यापेक्षा मतपेटीतूनच काय बोलायचे ते बोलू, असे सांगत असल्याने प्रचाराची हवा निघत चालल्याचे दिसत आहे. नाशिक मतदारसंघ लाटेवर चालणार असल्याचे बोलले जाते. शरद पवार यांच्या पुरोगाणी लोकशाही आघाडीला सर्वाधिक जागा देत येथील नागरिक लाटेवर स्वार झाले होते. त्यानंतर युतीच्या काळात 1995-96 मध्ये नाशिककरांनी युतीच्या पारड्यात मतदान टाकले होते.

      महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नवख्या पक्षालादेखील नाशिककरांनी साथ देत तीन आमदार व महापालिकेची सत्ता दिली होती. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीतही मोदी लाटेवर नाशिककर स्वार झाले होते. हीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीतही कायम राहिली. पुढे महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्तादेखील दिली. आता नाशिककर पुन्हा लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असल्याने नाशिकमधील राजकीय हवेचा रोख कुठल्या बाजूने आहे, हे सांगता येणे राजकीय विश्‍लेषकांनादेखील कठीण झाले आहे. 29 एप्रिलला मतदान होत असल्याने प्रचाराने शेवटच्या टप्प्याकडे वळण घेतले आहे. शेवटच्या वळणावर नागरिकांच्या मनात काय चाललंय याचा आढावा घेतला असता, मतदार ठाव लागू देत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ठराविक उमेदवारच निवडून येईल, असा दावा करणारे सध्या शांत बसले आहेत. जे काही दावे-प्रतिदावे सुरू आहेत, ते फक्त सोशल मीडियावर; परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून "मत' तयार करणे घातक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

दोघांत तिसऱ्याने केली गडबड 
महायुतीकडून हेमंत गोडसे, तर महाआघाडीकडून समीर भुजबळ निवडणूक लढवत आहेत. दोघांमध्ये दुरंगी सामना होईल, असे बोलले जात होते; परंतु माणिकराव कोकाटे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने दोघांत तिसऱ्याची भर पडल्याने अडचण निर्माण झाली आहे. कोकाटे यांनी सिन्नर, नाशिक तालुका, शहरातील तीन मतदारसंघांत प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याने ते महायुतीच्याच मतांमध्ये भागीदार होणार असल्याचा अनेकांचा अंदाज असल्याने श्री. गोडसे निवडून येतील या यापूर्वीच्या दाव्यातील हवा कमी झाली आहे. 
---------

Web Title: marathi news nashikkar problem