वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत शिदवाडी शाळेत मुलांना पुस्तकांची भेट

विजय पगारे
सोमवार, 5 मार्च 2018

विद्यार्थ्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निधीतून वायफळ खर्चाला फाटा देत शिदवाडी शाळेत शिकणाऱ्या मुलांना वाचनीय पुस्तकांची भेट देत वेगळा आदर्श उभा केला आहे. याप्रसंगी काव्यसंम्मेलन घेण्यात आले. 

इगतपुरी - आदिवासी, दुर्गम भागातील मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढावी व यात कायम सातत्य राखावे यासाठी याच शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निधीतून वायफळ खर्चाला फाटा देत शिदवाडी शाळेत शिकणाऱ्या मुलांना वाचनीय पुस्तकांची भेट देत वेगळा आदर्श उभा केला आहे. याप्रसंगी काव्यसंम्मेलन घेण्यात आले. 
 
यावेळी जेष्ठ साहित्यिक देविदास खडताळे, योगेश जोशी, रवींद्र पाटील, मुख्याध्यापिका विद्या पाटील कवी श्रीराम तोकडे, कवी सत्यवान वारघडे, भारती माठे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजू ठाकरे,चंदर ठाकरे, एकनाथ शिद विठ्ठल शिद, उत्तम पारधी, बाळू खाडे, काळू शिद, बबाबाई ठाकरे, अर्जून शिद उपस्थित होते.
      
यावेळी लहान मुलांसाठी बाल कवितांचे सादरीकरण देविदास खडताळे यांनी केले गणित बेरजेचे, चॅनल, गोष्ट जुनी, आजोबा, एक घास प्रश्न , रूणझूण आदी बालकवितांचे सादरीकरण मुलांचा उत्साह वाढवित होते  याप्रसंगी घडी कवितासंग्रह शाळेतील विद्यार्थ्यांना भेट दिले. योगेश जोशी यांनी देखील आपल्या खुमासदार शैलीत कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. 

यावेळी श्रीराम तोकडे, सत्यवान वारघडे, रवींद्र पाटील कवयित्री विद्या पाटील यांनी देखील आपल्या कविता सादर करून काव्यसंमेलनात रंगत आणली. यावेळी शालेय लेझीम व ढोल पथकाच्या संचलनाने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानिमित्त लेझीम व ढोल पथकास उत्कृष्ट संचलनामुळे बक्षीस देण्यात आले. 

यावेळेस नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांचा वाढदिवस अंतर्गत जमा झालेल्या रक्कमेतून साहित्यिकांची पुस्तके व कुसूमाग्रजांची प्रतिमा शाळेला भेट देण्यात आली. आगळावेगळा उपक्रम राबविणाऱ्या शाळेतील मुख्याध्यापिका विद्या पाटील व भारती माठे यांचे शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र नेरे, शिवाजी अहिरे,केंद्रप्रमुख अकबर शेख, राजेंद्र सोनवणे, पंडित धोंडगे आदीनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्या पाटील यांनी व आभार प्रदर्शन भारती माठे यांनी केले.
 

Web Title: marathi news nasik birthday celebration book donation school students