नियोजित नार-पारचे पाणी नांदगाव तालुक्याला प्राधान्याने देऊ - ना. गिरीष महाजन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

नांदगाव - नांदगाव तालुक्याच्या भीषण पाणी प्रश्नासंदर्भात जनतेच्या भावना तीव्र असतांना त्यास न्याय मिळवून देण्यासाठी तालुक्याचे माजी आमदार डॉ. अनिल आहेर यांनी पुढाकार घेत राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे सातत्याने पाठपुरावा चालु ठेवला होता. यासंदर्भात ना. विखे पाटील यांचे विनंतीवरुन राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांचे दालनात विशेष तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी तालुक्यावर झालेला अन्याय डॉ. आहेर यांनी विचार करुन तालुक्यात नार-पार चे पाणी येऊ शकते, हे लक्षात आणून दिले. यावेळी हि बाब अत्यंत गंभीरतेने घेत ना. महाजन यांनी नार-पार चे पाणी गोदावरी व तापी खोऱ्यात वळवून दोन्ही खोऱ्यांचा विकास करण्याचा संदर्भात सरकार मोठ्या प्रमाणत आग्रही असुन जिल्ह्याचे पाणी वाटप होतांना नांदगाव तालुक्याचा प्राधान्याने विचार करुन आजवर झालेला अन्याय दुर करु, असे आश्वासन दिले. ना. विखे पाटील यांचे शिष्टमंडळात माजी आमदार डॉ. अनिल आहेर, समाधान पाटील, डॉ. प्रभाकर पवार, सागर साळुंके उपस्थित होते. यावेळी शासनस्तरावरील जलसंपदा विभागाचे उप सचिव श्री. होळकर, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एच. ए. ढणगारे, उत्तर महाराष्ट्र जलसंपादाचे मुख्य अभियंता के. बी. कुलकर्णी कडानगरच्या अधिक्षक अभियंता श्रीमती. ए. एच. अहिरराव आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.

Web Title: marathi news nasik meeting with girish mahajan for water problem