पोलीस-वायुसेनेच्या जवानांची "नाशिक-नागपूर' सायकल रॅली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

नाशिक : सुरक्षित वाहतूक आणि आरोग्यासाठी सायकल रॅलीतून संदेश देण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाचे पोलीस व देवळाली कॅम्पच्या वायुसेनेचे जवान हे उद्या (ता.22) सकाळी नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून "नाशिक-नागपूर-नाशिक' सायकल रॅलीतून 12 जवान दहा दिवसांत 1500 कि.मी.चा प्रवास करून नाशिकमध्ये परत दाखल होणार आहेत. 

पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी, नाशिक-नागपूर-नाशिक सायकल रॅलीची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली. या सायकल रॅलीमध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयातील 6 पोलीस अधिकारी-कर्मचारी व देवळाली कॅम्प वायुसेनेचे 6 अधिकारी-जवान सहभागी होत आहेत. उद्या (ता.22) सकाळी साडेसात वाजता पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोरून रॅलीला प्रारंभ होणार आहे. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल व देवळाली कॅम्पचे एअर कमांडर जी.सी. भायंदर हे "नाशिक-नागपूर-नाशिक' रॅलीला हिरवा झेंडा दाखविणार आहेत.  
बारा जवान हे सायकलवरून नागपूरच्या दिशेने रवाना होतील. धुळे, भुसावळ, अकोला, अमरावती, नागपूर असा पहिल्या टप्प्यात ते पाच दिवसात पूर्ण करतील त्यानंतर परतीच्या प्रवासात यवतमाळ, वाशिम, जालना, शिर्डीमार्गे नाशिक असे ते 4 मार्च रोजी नाशिकमध्ये 1500 कि.मी. अंतर पार करून परतणार आहेत. प्रवासादरम्यान शाळा-महाविद्यालयांसह पोलीस मुख्यालयांमध्ये जाऊन हे जवान सुरक्षित वाहतूक व आरोग्याचा संदेश देणार आहेत. 

सहभागी जवान 
पोलीस आयुक्तालय : सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे, हवालदार नंदू उगले, बाळकृष्ण वेताळ, पोलीस नाईक सुदाम सांगळे, पोलीस शिपाई दिनेश माळी, किरण वडजे, हर्षल बोरसे, एम. के. धुम, फुलचंद पवार (वाहनचालक). 
वायुसेवा, देवळाली कॅम्प : स्कॉड्रन लिडर संतोष दुबे, फ्लाईंग लेफ्टनंट सुमीत, ज्युनियर वॉरंट ऑफिसर नितीन पाटील, सार्जंट संजय, कॉर्पोरल समीउल्ला, एस.ए. जाधव, रवींदर, लिडिंग एअरक्राफ्ट मॅन धीरज, सुमीत, मनजित. 

Web Title: marathi news nasik nagpur bicycle rally