नॅनो कारच्या माध्यमातून जेष्ठांची सेवा

marathi news nasik nano car service old people shivsena project
marathi news nasik nano car service old people shivsena project

इंदिरानगर (नाशिक)-  नाशिक शहरातील इंदिरानगर भागात प्रभाग क्रमांक २३ आणि ३० चे रहीवासी असलेल्या ज्येष्ठ नागरीकांच्या सोयीसाठी शिवसेनेतर्फे प्रभागात जाण्या-येण्यासाठी दहा वाताणुकूलीत नॅनो कारच्या माध्यमातून आई - वडिलांची सेवा हा कदाचित देशात पहिलाच ठरेल असा वेगळा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. सेनेचे युवा कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय मानवअधिकार संघाचे शहराध्यक्ष ऋषिकेश वर्मा यांनी हा उपक्रम हाती घेतला असून येत्या महिनाभरात ही सेवा ज्येष्ठांसाठी खुली करण्यात येणार आहे. संपर्क प्रमुख अजय चौधरी आणि पक्षाच्या जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची आखणी वर्मा यांनी केली आहे. 

इंदिरानगर भागातील या दोन्ही प्रभागांची व्याप्ती मोठी आहे. जुने विजय - ममता चित्रपटगृह, डीजीपीनगर, साईनाथनगर, विनयनगर पासून थेट नंदीनी नदी पर्यंत आणि वडाळा - पाथर्डी रस्त्यावर गुरूगोविंदसिंग महाविद्यालयाच्या दुतर्फा असलेल्या भागापासून थेट राणेनगर चौफुली पर्यंतचा भाग या दोन्ही प्रभागात समाविष्ठ आहे. लोकसंख्येचा विचार करता येथील लोकसंख्या देखील ८० हजाराच्या आसपास आहे. त्यात घरटी किमान एक तरी ज्येष्ठ नागरीक आहेत. बहुतांश ज्येष्ठ नागरीक हे एकटेच राहतात. मुले दुसऱ्या शहरात अथवा परदेशात आहेत. त्यामुळे जवळपास जर कुठे जायचे तरी त्यांना दुसऱ्यांवर अथवा भरमसाठ रिक्षाभाडे देत धडपड करावी लागते. ज्येष्ठांची संख्या आणि त्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन वर्मा यांनी हा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. त्या अंतर्गत त्यांनी १० नॅनो चारचाकी घेतल्या आहेत. त्यांच्यावर स्वतंत्र चालक असणार आहे. परिसरात राणेनगर, कलानगर, जॉगींग ट्रॅक, विनयनगर, अशोका मार्ग, विजय - ममता थिएटर, डीजीपीनगर येथे ह्या चारचाकी तैनात असतील. उर्वरीत तीन वाहने आवश्‍यकतेनुसार ठेवण्यात येणार आहेत. 

काय आहे उपक्रम 
परिसरातील ज्येष्ठ नागरीकांनी सर्वप्रथम यासाठी नोंदणी करायची आहे. याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. वाहनांचा देखभाल खर्च आणि चालकांचे मानधन भागवण्यासाठी महिन्याला अवघे 150 शुल्क त्यांना द्यावे लागेल. नोंदणी झालेल्या ज्येष्ठांना स्मार्टकार्ड देण्यात येणार आहे.त्यावर संबधीत वाहन क्रमांक आणि चालकाचा क्रमांक असणार असून बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र देखील दर्शनी भागात असेल. उपरोक्त दोन्ही प्रभागातील आप्तेष्ठ, भाजीबाजार, दवाखाने, हॉटेल्स, मंदीर आदी ठिकाणी जाण्यासाठी त्यांनी फक्त संबधीत चालकाला बोलवायचे आहे. दिवसभरात कितीही वेळा ह्याचा लाभ घेता येणार आहे. संबधित चालकांना देखील त्यांच्या भागातील सदस्यांचे नाव, पत्ते आणि संपर्क क्रमांक देण्यात येणार आहेत. सकाळी 7 ते 10 आणि दुपारी 5 ते 9 वाजेपर्यंत ह्या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. काल ता. 4 ला यासाठी नोंदणी करण्यास सुरवात झाली असून पहिल्याच दिवशी 42 ज्येष्ठांनी नोंदणी केली असल्याचे वर्मा यांनी सांगितले आहे.      

यापूर्व देखील प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. रुग्णवाहीका देखील उपलब्ध करून दिली आहे. परिसरातील ज्येष्ठांची संख्या खूप मोठी आहे. त्यांना मिळणारे निवृत्ती वेतन आणि रिक्षा आदी वाहनांसाठी त्यांना दररेाज भरावे लागणारे पैसे यामुळे त्यांचे आर्थिक गणित कोलमडते हे मी जवळून बघितले आहे, अशी प्रतिक्रिया ऋषिकेश वर्मा यांनी व्यक्तं केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com