सप्तश्रृंगी गडावर 'देवी पंचायतन' याग

दिगंबर पाटोळे
सोमवार, 8 जानेवारी 2018

वणी (नाशिक) - राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी स्वयंभू अर्धेपीठ असलेल्या सप्तश्रृंगी गडावर आदिमाया श्री. सप्तश्रृंगी मंदीरात 'देवी पंचायतन यागास' देवीच्या जयजयकारात, पुरोहितांच्या मंत्रघोषात मंगलमय वातावरणात उत्साहात सुरुवात झाली. दरम्यान आज धनुर्मासातील चौथ्या रविवारी सुर्य किरणांनी देवीचे चरणस्पर्श केले असून हे दृश्य बघण्यासाठी हजारो भाविकांनी देवी सभामंडपात गर्दी केली होती.

आदिमाया सप्तश्रृंगी गडावर कालपासून (ता. 7 जाने) तीन दिवसीय 'देवी पंचायतन' यागास उत्साहात सुरुवात झाली. काल सकाळी देवी पंचायतन यागासाठी सप्तश्रृंगी देवी
न्यासाच्यावतीने पुरोहितांना निमंत्रित करण्यात आले. पुरोहितांनी विधीपूर्वक निमंत्रण स्विकारीत गडावरील बाह्यतीर्थ घेवून गडावरील शनी, मारुती, श्री दत्त मंदीरात जावून ग्रामदेवतांना पान, सुपारी, नारळ अर्पण करीत पुजन केले. शिवालय तीर्थावर जावून तीर्थपुजन करीत महादेव व ग्रामदेवतेला पंचायतन विधीसाठी आवाहन करण्यात आले. मंदीरातील सभामंडपातील यज्ञमंडपात पंचायन कर्म, दहा चौरंगाचे पुजन करुन श्री गणेश, देवी, विष्णु, शीव, सुर्य या पाच देवतांची स्थापना करीत अग्नी पुजन, नवगृह पुषन करीत पुष्पांजली करीत देवी पंचायतन विधीस उत्साहात सुरवात करण्यात आली. या विधीसाठी पंधरा पुरोहित सहभागी झाले असून गडावर भाविकांच्या जयघोष व पुरोहितांच्या मंत्रघोषाने अवघा सप्तश्रृंगगड दमदमुन गेला आहे. आज धनुर्मासातील चौथ्या रविवार निमित्त पहाटे पाच वाजता देवीची पंचामृत महापूजेस प्रारंभ झाला. सकाळी देवीच्या मूर्तीचा सुर्याच्या कोवळे व तेजस्वी किरणांनी चरणस्पर्श करतांच आई भगवतीचा एकच जयघोष होवून धुनर्मास आरती संपन्न झाली. दरम्यान आज नववर्षातील पहिला रविवारच्या सुट्टी, धुनर्मास उत्सव व देवी पंचायतन याग असा त्रिवेनी योगाचा लाभ उचलत सुमारे तीस हजार भाविक देवीचरणी नतमस्तक झाले. सध्या गडावर शैक्षणिक हिवाळी सहलींची रेलचेल मोठ्या प्रमाणात सुरु असून राज्यातील ठिकठिकाणचे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी सप्तश्रृंगी गडास भेट देत आहे.

Web Title: marathi news nasik religious news lord saptashrungi