नवापूर तालुक्‍यात "पीपीई' विना यंत्रणेची कोरोनाशी लढाई 

corona ppe
corona ppe

नवापूर : कोरोना या विषाणूचा संसर्ग झालेला आहे किंवा नाही याची प्राथमिक तपासणी करणारे इन्फ्रारेड थर्मल स्कॅनर अद्याप उपलब्ध झाले नाही. आरोग्य तपासणी करणाऱ्या पथकाला, वैद्यकीय टीमला, पोलिसांना, महसूल विभाग व या कामाशी जुळलेल्या सर्व आवश्यक घटकाला पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट अद्यापही मिळाले नाही. 

तालुक्यात, जिल्ह्यात कोरोना विषाणूची लागण झाल्यावर प्रशासन जागे होणार आहे का. कोरोना संदर्भात आवश्यक साधन सामग्री लवकर मिळावी यासाठी आमदार शिरिषकुमार नाईक प्रयत्नशील आहेत, तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे, मग प्रशासन कोणाची वाट पाहत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे आहे. अत्यावश्यक गरजा तात्काळ उपलब्ध झाल्या पाहिजे ही तळमळ जीव मुठीत धरून काम करणाऱ्या सर्व यंत्रणेची आहे. जबाबदार घटक वातानुकूलित कक्षात बसून समजून घ्यायला तयार नाही. फिल्ड वर्क वरील परिस्थिती फार गंभीर आहे साहेब,  असा संताप कर्मचाऱ्यांमध्ये आहे मात्र तो दबक्या आवाजात व्यक्त होत आहे . हा घटक वेळप्रसंगी सुविधाअभावी असहकार्याचा बंड पुकारू शकतो. 

वेळ काढू धोरण 
कोविड- १९ या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा आपापल्या परीने काम करीत आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग हा संपर्कात आल्याने होतो. सोशियल डिस्टन आवश्यक आहे, या बाबत जनजागृती मोठ्याप्रमाणात सुरू आहे. मात्र तालुक्यात आवश्यक तपासणी किट अद्याप मिळाली नाही. जिल्हा किंवा राज्य प्रशासन याबाबत अद्याप वेळकाढू धोरण अवलंबून आहे.

सुरवातीपासूनच मागणी 
नवापूर तालुक्यात जनता कर्फ्युच्या आधीपासून कोरोना व्हायरसबाबत तालुका आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, महसूल विभाग व त्याच्याशी जुळलेली सर्व यंत्रणा दक्ष आहे. कोरोना विषाणूची लागण झालेली आहे किंवा तसे लक्षणं आहेत का याची विचारपूस  स्वतःच्या आरोग्याची कुठल्याही प्रकारची खबरदारी न घेता केली जात आहे.  विदेशातून अथवा परराज्यातून येणाऱ्या व्यक्तीची तपासणी करणारे इन्फ्रारेड थर्मल स्कॅनरची मागणी सुरवातीपासून आहे. स्वतः च्या सुरक्षासाठी पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंटची अत्यावश्यक गरज आहे ते सुद्धा उपलब्ध होत नाही. 

यंत्रसामुग्रीत हे हवे 
कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा, पोलिस प्रशासन, महसूल विभाग व त्याच्याशी जुळलेली सर्व यंत्रणा रात्रंदिवस व्यस्त आहे. या सर्वांना पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंटची गरज आहे. आवश्यक आरोग्य यंत्र सामुग्रीत शंभर इन्फ्रारेड थर्मल स्कॅनर,  मशीन पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट च्या एक हजार किटस, दोन व्हेंटिलेटर, कोरोना  टेस्टिंगच्या ५० किटस,  फेस मास्क थ्री लेअर ग्लोव्हज १० हजार नग, सॅनिटायजर पाच हजार नग आदी साहित्यची मागणी केली आहे, लवकरच सर्व साहित्य उपलब्ध होईल.


 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com