रस्‍त्‍याच्‍या मधोमध उभ्‍या कारमध्‍ये रक्‍ताने माखलेला मृतदेह; सुरतच्‍या व्‍यक्‍तीचा खून

रस्‍त्‍याच्‍या मधोमध उभ्‍या कारमध्‍ये रक्‍ताने माखलेला मृतदेह; सुरतच्‍या व्‍यक्‍तीचा खून
crime muder case
crime muder casecrime muder case

नवापूर (नंदुरबार) : शहरातून जाणाऱ्या धुळे- सुरत (Dhule surat national highway) राष्ट्रीय महामार्गावर सुरत येथील भावेशभाई मेहता या व्यक्तीचा कारमध्ये रक्ताने माखलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोलीस यंत्रणा तपास करण्यासाठी (Navapur police) गुजरात राज्यात रवाना झाली आहे. खून कोणी केला? का केला हे अद्याप स्पष्ट झालेले नसल्‍याचे पोलीस यंत्रणेचे म्हणणे आहे. (navapur-crime-news-surat-highway-car-deathbody-murder-case)

नवापूर येथील बीएसएनएल कार्यालयासमोर रस्त्याच्या मधोमध उभ्या कारचा पोलिसांनी तपास केल्यावर कारच्या मागील सीटवर रक्ताने माखलेला (Murder case) मृतदेह आढळून आला. याबाबत नवापूर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime muder case
अंगणवाडी सेविकांना इंग्रजीत माहिती भरण्याची सक्ती; उडतेय तारांबळ

गाडी नंबरवरून तपास

भावेशभाई सी मेहता (भटार रोड सुरत) या व्यक्तीचा खून झाला आहे. मात्र कोणी केला, त्यामागील कारण अद्याप निष्पन्न झाले नाही. घटनास्थळी पोलिसांनी कार क्रमांकावरून खून झालेल्या मृतदेह कोणाचा, कार कोणाची याबाबत तपास सत्र सुरू केल्यानंतर मयत व्यक्तीचे नाव व पत्ता मिळाला.

रस्‍त्‍याच्‍या मधोमध कारबाबत संशय

गुजरात राज्याची पासिंग असलेली कार (जी.जे. ०५ टीसी ००१७) भावेश मेहता यांचे प्लास्टिक टेपच्या सहाय्याने तोंड बांधुन धारदार शस्त्राने वार करून खून केला. तसेच कार नवापूर येथील दूरध्वनी कार्यालयासमोर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मधोमध लावून कारची चावी घेऊन फरार झाले. कार बंद पडली म्हणून कार व खून झालेल्या व्यक्तीला सोडून फरार झाले की अजून काही वेगळे कारण आहे; हे अद्याप गुलदस्त्यात आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक धिरज महाजन यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com