esakal | घरात साठवून ठेवलेले सागवानी लाकडाचा लावला शोध 
sakal

बोलून बातमी शोधा

home sagvan wood

नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांना मिळालेल्या माहितीवरून वनविभागाचे नियतक्षेत्र भवरे (काटवणपाडा) येथील संशयित आरोपी संत्र्या सदन गावित याच्या घराची सर्च वॉरंटने झडती घेतली.

घरात साठवून ठेवलेले सागवानी लाकडाचा लावला शोध 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवापूर (नंदुरबार) : भवरेचा काटवणपाडा (ता. नवापूर) येथे वन विभागाच्या पथकाने एका संशयित घराची तपासणी केली असता घरात ताज्या तोडीचे सागवानी लाकडाचे २९ नग मिळाले. अवैद्य रित्या साठवणूक केलेला साठ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांना मिळालेल्या माहितीवरून वनविभागाचे नियतक्षेत्र भवरे (काटवणपाडा) येथील संशयित आरोपी संत्र्या सदन गावित याच्या घराची सर्च वॉरंटने झडती घेतली. घरात ताज्या तोडीचे साग साईज प्रजातीचे २९ नग कट साईज नग घडतळ केलेला लाकूड माल अवैद्य रित्या साठवणूक केलेला आढळून आला. हा मुद्देमाल जप्त करून शासकीय वाहनांने व खाजगी वाहनांने नवापूर शासकीय विक्री आगारात पावतीने जमा केला. ही कार्यवाही वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, पोलिस हवालदार पाडवी, वनपाल ए. एन. चव्हाण, पी. एस .पाटील, डि. के. जाधव, एन. जी. मंडलिक, वनरक्षक प्रशांत सोनवणे, आरती नगराळे, सतीश पदमर, कल्पेश अहिरे, कमलेश वसावे, संतोष गायकवाड, लक्ष्मण पवार, रामदास पावरा, डि. ए. सूर्यवंशी, आर. के. पावरा, के. पी. गावित, अशोक पावरा, नितीन पाटील, अनिल वळवी, बी. ओ. पावरा, व कायम वनमजूर यांनी केली. 

सदर गुन्ह्याबाबत भवरे वनरक्षक नितीन पाटील यांनी संबंधित आरोपी नावे गुन्हा दाखल केला असून पुढील कार्यवाही उपवनसंरक्षक शहादा, उपविभागीय वनअधिकारी दक्षता पथक धुळे, साहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार, वनक्षेत्रपाल नवापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.