स्टेट बॅंकेचे बनावट शिक्के वापरून फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

नवापूर : स्टेट बॅंकेचे बनावट शिक्के वापरून पावणेदोन लाख रुपयांची मुदत ठेवीची पावती तयार करून दिली. प्रत्यक्षात ते पैसे बॅंकेत भरणा केले नाहीत. याबाबत बिंग फुटल्याने, प्रकार अंगलट येऊ नये म्हणून शाखाधिकाऱ्याने एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तालुक्‍यात अशाप्रकारे अनेकांची फसवणूक झाली असण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

स्टेट बॅंकेच्या येथील शाखेत मुदत ठेव ठेवण्यासाठी उमाकांत देविदास हिरे गेले होते. त्यावेळी बॅंकेचा एजंट असल्याप्रमाणे भासवणारा अशोक साबू वसावे (रा. बंधारे ता. नवापूर) हा होता. त्याने श्री. हिरे यांना मुदत ठेवीची रक्‍मक ठेवण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रांसाठी सहकार्य केले. त्यांनी त्याच्याकडे पैसे दिले. त्याने ठेव रकमेची पावती काही वेळात आणून दिली. मुतद ठेव प्रमाणपत्रही दिले. त्यामुहे श्री. हिरे यांचा विश्‍वास बसला. 26 जानेवारी आणि 2 एप्रिलला हा प्रकार घडला. दोन वेळ मिळून श्री. हिरे यांनी ठेव ठेवण्यासाठी एक लाख 75 हजार रुपये दिले. त्यानंतर श्री. हिरे यांनी बॅंकेत तपास केला असता, या पावत्यांची कोणतीच नोद बॅंकेत आढळली नाही. याबाबत वसावेकडे विचारणा केली असता, प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर आपले बिंग फुटले आहे, असे लक्षात येताच त्याने श्री. हिरे यांचे पैसे परत केले. 

श्री. हिरे यांचे पैसे मिळाल्याने त्यांनी पुढे विषय थांबवला. मात्र बॅंकेच्या बनावट शिक्‍क्‍यांचा वापर केला असल्याने शाखाधिकारी कमलेशकुमार देवेंद्रसिंग यांनी नवापूर पोलिस ठाण्यात अशोक वसावेविरुध्द फसवणूकीची तक्रार दाखल केली. बॅंकेच्या बनावट शिक्‍क्‍यांचा वापर त्याने अन्यत्र केला असावा, अजून कोणाची फसवणूक केली असावी, त्यावेळी प्रकरण अंगाशी येईल म्हणून ही तक्रार करण्यात आली. अन्यथा स्टेट बॅंकेने याबाबत लक्ष घातले नसते. याबाबत अशोक वसावे विरुद्‌ध काल (ता. 26) रात्री अकराला गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितास रात्री साडेअकराला अटक करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक भंडारे तपास करत आहेत.

Web Title: marathi news navapur state bank stamp