नवनाथ स्थानांसाठी एमटीडीसीचे सहलींचे  नियोजन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

नाशिक : पर्यटन विकास महामंडळाने नगर जिल्ह्यातील श्री. क्षेत्र मढी व सिध्द श्री. नवनाथ समाधी स्थानांच्या प्रदक्षिणा मार्गांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या जुनपासुन विद्यार्थी व ज्येष्ठ नागरीकांसाठी एसटी महामंडळाच्या माध्यमातुन सवलतीच्या दरात सहलीही घडवुन आणल्या जाणार आहेत

पर्यटन विकास महामंडळाचे सहव्यस्थापकीय संचालक अशुतोष राठोड यांनी पत्रकार परीषदेत दिली.श्री.राठोड म्हणाले, संपुर्ण भारतात नवनाथांची नऊ स्थाने आहे. त्यापैकी सहा स्थाने फक्‍त नगर जिल्ह्यात आहेत. मढीच्या यात्रेला दरवर्षी लाखोच्या संख्येने भावीक जमतात. मात्र पुरेशा सुविधा नसल्याने भाविकांची गैरसोय होते. आता ती गैरसोय दुर करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. येत्या वर्षभरात पिण्याचे शुध्द पाणी, स्वच्छता गृहे, रस्ते, निवास व्यवस्था, व सुरक्षा आदी कामे केली जाणार आहेत.त्यानंतर एसटी महामंडळाच्या माध्यमातुन येत्या जुन पासुन विशेष सहली सवलतीच्या दरात आयोजीत केल्या जाणार आहेत. असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी महामंडळाचे प्रादेशीक अधीकारी नितीन मुंडावरे, माजी जिल्हाधीकारी रघुनाथ राठोड उपस्थीत होते. 

Web Title: marathi news navnath sanath