राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे  महागाईविरोधात निदर्शने 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

नाशिक ः सत्ताधारी भाजपच्या कारकीर्दीत महागाईने नागरिक त्रस्त असून, शेतकरी, शेतमजूर, कामगार-कष्टकऱ्यांसह महिला, विद्यार्थी होरपळून निघाले आहेत. त्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे शनिवारी (ता. 20) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. 

निवेदनात म्हटले, की पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडरचे दर कमी करावेत. दुष्काळी स्थितीमुळे शेतीची पैसेवारी 50 पेक्षा कमी करावी. ग्रामीण भागातील विजेचे भारनियमन कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा. शेतमालाला हमीभाव द्यावा. दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी. बेरोजगार युवकांना नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळावी. ज्येष्ठांच्या निवृत्तिवेतन योजनेतील अटी रद्द कराव्यात. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, माजी खासदार देवीदास पिंगळे, विष्णुपंत म्हैसधुणे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब म्हस्के, सोमनाथ खातळे, योगेश निसाळ, आकाश कोकाटे, दिलीप कांबळे आदी उपस्थित होते. 
 
Web Title: marathi news ncp andolan