स्ट्रॅटेजीनुसारच वागा, आढेवेढे घेउ नका: अजित पवार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

नाशिक ः समविचारी पक्षांनी एकत्र आल्याशिवाय जातीयवादी पक्षांला सत्तेवरुन पायउतार करता येणार नाही. विधान परिषद निवडणूक ही आगामी बदलाची सुरुवात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यानी आघाडीच्या स्ट्रॅटेजीनुसार वागावे आढेवेढे न घेता ऍड शिवाजी सहाणे यांना विजयी करावे. असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 

नाशिक ः समविचारी पक्षांनी एकत्र आल्याशिवाय जातीयवादी पक्षांला सत्तेवरुन पायउतार करता येणार नाही. विधान परिषद निवडणूक ही आगामी बदलाची सुरुवात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यानी आघाडीच्या स्ट्रॅटेजीनुसार वागावे आढेवेढे न घेता ऍड शिवाजी सहाणे यांना विजयी करावे. असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 

श्री सहाणे यांच्या प्रचारासाठी खुटवटनगर येथील श्री सिध्दी बॅक्‍वेट हॉल येथे आज कॉग्रेस आघाडी घटक पक्षांचा मेळावा झाला. त्यात श्री पवार बोलत होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात,उमेदवार शिवाजी सहाणे, आमदार अपूर्व हिरे, जयंत जाधव,निर्मला गावीत, दिपिका चव्हाण, नरहरी झिरवाळ, हेमंत टकले, महापौर रशीद शेख, मनसेचे राहूल ढिकले कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, ऍड रविंद्र पगार, माजी खासदार देविदास पिंगळे प्रतापदादा वाघ, माजी मंत्री शोभा बच्छाव, शरद आहेर,गजानन शेलार आदीसह आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

श्री पवार म्हणाले की, युतीच्या कामकाजाला सामान्य माणूस वैतागला आहे. सामाजिक विद्वेष वाढला आहे. जातीयवादी पक्षांना सत्तेवरुन खेचण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र आल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस धर्मनिरपेक्ष विचारांच्या घटक पक्षांना एकत्र घेउन निवडणूकीला सामोरा जात आहे. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टळणार नाही, त्यासाठी देशपातळीवर शरद पवार व राहूल गांधी यांनी धर्मनिरपेक्ष घटक पक्षांची जुळवाजुळव सुरु केली आहे.

विधान परिषद निवडणूक ही त्यादृष्ट्रीने सुरु झालेली आगामी बदलाची सुरुवात आहे. श्री बाळासाहेब थोरात व मी स्वता बसून त्यासाठी तयारी करणार आहे. त्यामुळे पक्षाकडून येणाऱ्या सुचनानुसार कामकाज करा असे आवाहान केले. तत्पूर्वी त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था, भुजबळांचा तुरुंगवास, दूध दरवाढ साखर आयात आदी विषयांच्या ÷अनुषंगाने युती सरकारवर जोरदार टिका केली. 

कॉग्रेसचे पालकत्व थोरातांकडे 
कॉग्रेस पक्षाचे पालकत्व आज पून्हा बाळासाहेब थोरांताकडे आल्याचे दिसले. श्री थोरात यांनीही, ही निवडणूक राज्यातील आगामी सत्ता परिवर्तनाची सुरुवात ठरेल. युतीतील असंतोषाचा फायदा घेत आघाडीच्या कार्यकर्त्यानी सहाणे यांना निवडून आणावे. नाशिक हा आघाडीचा आवडता जिल्हा आहे. त्यामुळे अनेक अर्थानी महत्व असलेल्या या 
निवडणूकीबाबत काम करण्याचे आवाहान केले. तत्पूर्वी मनसेचे राहूल ढिकले,जयंत जाधव, राजाराम पानगव्हाणे यांची भाषणे झाली. ऍड पगार यांनी प्रास्ताविक सूत्रसंचालन केले. 

मनसे आघाडीसोबत 
पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, विधान परिषदेच्या निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कॉग्रेस आघाडीसोबत रहाणार असल्याची माहीती मनसेचे प्रदेश चिटणीस ऍड राहून ढिकले यांनी मांडली. 

नाशिकला कहरच... 
नाशिकचे मतदारांचे मला काही कळत नाही. ते कहरच करता. इंजिन चालवलं सगळ इंजिनच कमळ तर कमळच चालविता. मतांचा आधिकार तुमचाच आहे. पण जरा विचार 
करुन निर्णय घेउन सामान्यांच्या हितासाठी एकत्र येणाऱ्यांनाही साथ द्या. असे आवाहान केले. महापालिका आयुक्तांवर नाव न घेता टिका करतांना, सामान्यांचे कंबरडे मोडेल 
एवढी करवाढ करायला आधिकारी मालक समजता का ? जे महापौरांनाही जुमानत नाही. इथले पालकमंत्री काय करता. राज्याची एवढी वाईट स्थिती कधी पाहिली नाही. 
 

Web Title: marathi news ncp melava