कांदा, टोमॅटोच्या भावासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उद्या रेल्वे रोको 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

नाशिक -: शेतकऱ्यांचा कांदा, टोमॅटो व अन्य शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करून कांदा, टोमॅटोसह शेतमालाला हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी येत्या सोमवारी (ता.26) सकाळी नउला मनमाडला रेल्वे रोको करण्यात येणार आहे. 

टोमॅटोला अगदीच किरकोळ भाव मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना टोमॅटो फेकून द्यावा लागला आहे. कांद्याचे भाव वाढल्यावर भाव खाली येऊन स्थिर रहावे यासाठी सरकारतर्फे हस्तक्षेप करणे अपेक्षित होते. मात्र सरकारने दुलर्क्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने शेतकरी प्रचंड हतबल आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे तालुकावार रास्ता रोको, तहसीलदार कार्यालयांवर कांदा फेको व अन्य आंदोलने झाली. मात्र सरकारकडून प्रतिसाद नसल्याने सोमवारी (ता.26) सकाळी नउला रेल्वे रोको करण्यात येणार आहे. अशी माहीती ऍड. रविंद्र पगार यांनी दिली. 

Web Title: marathi news ncp rail roko