जिल्हा बॅकेच्या पीककर्ज वितरणात 90 टक्के घट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 मार्च 2018

नाशिकः शेतकऱ्यांना गेल्यावर्षी 1719 कोटीचे पीककर्ज वाटलेल्या जिल्हा बॅकेने यंदाच्या आर्थिक वर्षात कसेबसे 200 कोटी पीककर्ज वाटले आहे. शेतकऱ्यांची बॅक म्हटल्या जाणाऱ्या जिल्हा बॅकेच्या पीककर्जाच्या वाटपात 90 टक्के घसरण झाली आहे. 

नाशिकः शेतकऱ्यांना गेल्यावर्षी 1719 कोटीचे पीककर्ज वाटलेल्या जिल्हा बॅकेने यंदाच्या आर्थिक वर्षात कसेबसे 200 कोटी पीककर्ज वाटले आहे. शेतकऱ्यांची बॅक म्हटल्या जाणाऱ्या जिल्हा बॅकेच्या पीककर्जाच्या वाटपात 90 टक्के घसरण झाली आहे. 

शेतकऱ्यांची बॅक म्हटल्या जाणाऱ्या जिल्हा बॅकेच्या आर्थिक स्थितीत अजूनही सुधारणा झालेली नाही. नोटा बंदीच्या काळात बॅकेने स्विकारलेल्या पण रिर्झव बॅकेकडून बदलून न मिळालेल्या सुमारे 21.32 कोटी नोटाबाबत प्रश्‍नचिन्ह कायम आहे. रिर्झव बॅकेकडून नोटा बदलून मिळत नाही. राज्य शासनाकडून लक्ष दिले जात नाही. अशा स्थितीत आजही बॅकेला जून्या नोटा बदलून मिळण्याची आशा कायम आहे. इतर कारणातून तोटा कमी करण्याचे प्रयत्न आकाराला आलेले नाहीत. बॅकेचा तोटा 120 कोटी इतका असून त्यात कपात करता करता 99 कोटी हा तोट्याचा आकडा कमी करण्यात प्रशासनाला यश आले आहे. 1168 संस्थाच्या 186 कोटीच्या ठेवीवर बॅकेकडून गेल्या 8 वर्षात साधा लाभांशही दिलेला नाही. 

कारखान्याची थकबाकी 
नाशिक सहकारी साखर कारखाना आणि निफाड कारखाना या दोन कारखान्यांची थकबाकी ही मोठी समस्या बॅकेपुढे आले आतापर्यत दोनदा प्रयत्न होउनही दोन्ही पैकी एकाही कारखान्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. आर्थिक डबघाईस आल्याचा बॅकेच्या कामावर मोठा परिणाम झाला आहे. ठेवीची संख्या 3121 कोटीहून 2839 कोटीपर्यत कमी झाल्या आहेत. एनपीए 16.41 कामकाजात सुधारणा करीत, प्रति कर्मचारी व्यवहार 3.52 लाखांपर्यत वाढविण्यात यश आले असले तरी, जून्या नोटा, कारखान्याची थकबाकीचे विषय मात्र अजूनही पाठ सोडत नाही. जिल्हा परिषदेच्या ठेवीचे प्रमाण कमी झाले असून जेमतेम नउ कोटीच्या आसपास ठेवी शिल्लक असल्याने भेडसावतो आहे. सहकार मंत्र्याकडे बॅकेने मांडलेली कैफियत ऐकली गेली असली तरी त्यावर उपाय मात्र निघालेला नाही. 

Web Title: marathi news ndcc bank