जिल्हा बॅंकेकडून सात डिसेंबरला तीन कोटींच्या जागांचा लिलाव 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

नाशिक  नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत मोकळ्या जागा विक्रीस सभासदांनी परवानगी दिल्यानंतर त्या साडे तीन कोटी रुपयांच्या जागांचा लिलाव बॅंकेने काढला आहे. हा लिलाव सात डिसेंबरला होईल. पिंपळगाव (बसवंत), उगाव व सटाणा येथील बॅंकेच्या स्वःमालकीच्या बखळ जागा विक्री करण्याबाबत नाबार्डने तपासणी अहवालात घेतलेल्या मुद्दा व बॅंकिंग रेग्युलेशन ऍक्‍ट 1949 अन्वये कायद्यातील कलम 9 मधील तरतुदीनुसार बॅंकेच्या अव्यवसायिक मालमत्ता बॅंकेस धारण करता येत नाही.त्यसाठी विभागीय सहनिबंधक मिलीद भालेराव यांनी 13 डिसेबर 2017ला परवानगीचे पत्र दिले.

नाशिक  नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत मोकळ्या जागा विक्रीस सभासदांनी परवानगी दिल्यानंतर त्या साडे तीन कोटी रुपयांच्या जागांचा लिलाव बॅंकेने काढला आहे. हा लिलाव सात डिसेंबरला होईल. पिंपळगाव (बसवंत), उगाव व सटाणा येथील बॅंकेच्या स्वःमालकीच्या बखळ जागा विक्री करण्याबाबत नाबार्डने तपासणी अहवालात घेतलेल्या मुद्दा व बॅंकिंग रेग्युलेशन ऍक्‍ट 1949 अन्वये कायद्यातील कलम 9 मधील तरतुदीनुसार बॅंकेच्या अव्यवसायिक मालमत्ता बॅंकेस धारण करता येत नाही.त्यसाठी विभागीय सहनिबंधक मिलीद भालेराव यांनी 13 डिसेबर 2017ला परवानगीचे पत्र दिले. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने 31 मार्च 2019 पर्यंत विक्री करण्यास दिलेल्या मुदतीत जागा विक्रीची कार्यवाही करणे बंधनकारक आहे.

     बॅंकेने हा जाहीर लिलाव काढला आहे. आठ सप्टेंबर 2018 च्या सर्वसाधारण सभेतही त्यास सभासदांनी मान्यता दिली आहे. त्याप्रमाणे बॅंकेने कार्यवाही चालू केली असून बॅंकेच्या पिंपळगाव (ब) जागेसाठी88 लाख रुपये,उगाव येथील जागेसाठी 96 लाख रुपये व सटाणा येथील जागा एक कोटी 73लाख रुपये असे बाजार मुल्यांकन निश्‍चित करण्यात आले आहे. या जागेचा जाहीर लिलाव सात डिसेंबरला दुपारी दोनला बॅंकेच्या द्वारका येथील प्रधान कार्यालयात बॅंकेच्या सभागृहात ठेवण्यात आला आहे. बखळ जागा बॅंकेला स्वताः जवळ ठेवता येत नसल्यानेच हा लिलाव काढण्यात आल्याचे बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

Web Title: marathi news NDCC BANK LAND