कर्जमाफी रकमेबाबत जिल्हाधिकारी-जिल्हा बॅंकेत उद्या बैठक 

residentional photo
residentional photo

नाशिक ः शेतकरी कर्जमाफीची सुमारे पाचशे कोटींची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात टाळाटाळ करण्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकेविरोधात शासनाला प्रस्ताव पाठविला आहे. त्यावरून सुरू असलेला तिढा कायम असताना गुरुवारी (ता. 27) जिल्हाधिकाऱ्यांकडे जिल्हा बॅंकेच्या संचालकांची बैठक होणार आहे. 

खरीप हंगामाच्या तोंडावर प्रशासनाला शेतकऱ्यांच्या पीककर्जाच्या वितरणाचे वेध लागले आहेत. कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी कर्ज उपलब्ध होण्यासाठी शासनाने कर्जमाफी केली. त्यापोटी साडेसहाशे कोटींच्या आसपास रक्कम जिल्ह्याला मिळाली. मात्र संबंधित रक्कम शेतकऱ्यांना न देताच त्यातील पाचशे कोटींहून अधिक रक्कम जिल्हा बॅंकेने इतर कामावर खर्च केली. बॅंकेच्या ठेवीदारांचे पैसे वितरणासाठी खर्ची केल्याने अनेक शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यात अडचणी येण्याची चिन्हे आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com