नीरव मोदी परदेशात, भुजबळ तुरुंगात...! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

नाशिक - कुठलाही आरोप सिद्ध होण्यापूर्वीच अटक करून राजकीय कारकीर्द संपविण्याची भाजप सरकारने प्रथा पाडली आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या बाबतीतही सरकारने तेच केले. भुजबळ सहकार्य करण्यास तयार असतानाही त्यांना दोषी मानून तुरुंगात टाकले. साडेबारा हजार कोटींचा गैरव्यवहार करूनही नीरव मोदी एकीकडे देश सोडून पळून जातोय, तर दुसरीकडे न्यायासाठी दाद मागणाऱ्या भुजबळांना मात्र सरकारने तुरुंगात डांबलेय, यासारखे दुसरे दुर्दैव काय आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे गटनेते आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

नाशिक - कुठलाही आरोप सिद्ध होण्यापूर्वीच अटक करून राजकीय कारकीर्द संपविण्याची भाजप सरकारने प्रथा पाडली आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या बाबतीतही सरकारने तेच केले. भुजबळ सहकार्य करण्यास तयार असतानाही त्यांना दोषी मानून तुरुंगात टाकले. साडेबारा हजार कोटींचा गैरव्यवहार करूनही नीरव मोदी एकीकडे देश सोडून पळून जातोय, तर दुसरीकडे न्यायासाठी दाद मागणाऱ्या भुजबळांना मात्र सरकारने तुरुंगात डांबलेय, यासारखे दुसरे दुर्दैव काय आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे गटनेते आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना बदनाम करण्यासाठी व्हिडिओ क्‍लिपचा आधार घेऊन सरकारने लढविलेली शक्कल असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. 

हल्लाबोल मोर्चा व नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी पाटील नाशिकला आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंडे प्रकरणावर बोलताना त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, की विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून मुंडे यांचे चांगले काम सुरू आहे, त्यामुळे व्हिडिओ क्‍लिपचा आधार घेऊन त्यांना बदनाम केले जात आहे. मुंडे यांनी सभागृहात जशास तसे उत्तर देऊन सरकारची बोलती बंद केली आहे. आमदार हेमंत टकले यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडल्याने त्यातून सत्य बाहेर येईलच. त्याची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

Web Title: marathi news neerav modi jayant patil