Video शिवसेनेचा "न्हाई'ला अल्टीमेटम 

shivsena aandolan
shivsena aandolan

जळगाव ः शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाली असून, खड्ड्यांमुळे रोज अपघात होवून मृत्यू होत आहेत. या विरोधात शिवसेनेतर्फे आज "न्हाई'च्या कार्यालयात जावून प्रकल्प संचालक सी.एन. सिन्हा यांची भेट देवून आवाज उठविला. तसेच चार दिवसांचा अल्टीमेटम देवून यानंतर तोंडाने बोलणार नाही; तर हात चालवू असा इशारा दिला. 


शहरातून गेलेल्या महामार्गावर प्रचंड मोठे खड्डे झाले आहेत. शिवाय साईडपट्टया देखील खोल झाल्या असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावर जणू अपघातांची मालिकाच सुरू आहे. साधारण महिनाभरापुर्वी एरंडोलजवळ झालेल्या कालिपीली व ट्रकच्या अपघातात तब्बल नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तेव्हापासून सुरू झालेली अपघातची मालिका सुरू आहे. तर गेल्या आठवड्यात पाळधी येथे लग्नासाठी जाणाऱ्या दाम्पत्याला जीव गमवावा लागला. तसेच पारोळ्याजवळ बुधवारी (ता.22) झालेल्या अपघातात दोघा भावडांचा जीव गेला. 

शिवसेनेने भरला दम 
महामार्गावर होणाऱ्या अपघातात अनेकांचे जीव गेले आहेत. या विरोधात शिवसेना महानगरतर्फे यापुर्वी निवेदन देण्यात आले आहेत. परंतु आज आवाज उठविण्यात आला. शिवसेनेच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी "न्हाई'च्या कार्यालयात जावून न्हाईचे प्रकल्प संचालक सी. एन. सिन्हा यांची भेट देवून महामार्गावरील खड्डे बुजविणे आणि साईडपट्ट्या बुजविण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला. यावेळी उपस्थित असलेल्या ठेकेदारास देखील दम भरत चार दिवसांनी येवून तोंडाने बोलणार नाही; तर हात चालवू अशा शब्दात दम भरला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com