तिच्या डोळ्यांनी आणि त्याच्या बुद्धीने फुलवला संसार

माणिक देसाई 
बुधवार, 7 मार्च 2018

निफाड : विवाह बंधनात अडकल्यानंतर अवघ्या पाचच वर्षात पतीची हळु हळु दृष्टी जाणे आणि त्याही परीस्थीशि झगडा देत धिरोदात्तपणे आपले डोळे आणि पतीच्या मार्गदर्शनाच्या जोरावर कारसुळ (ता. निफाड) च्या रणरागिणीने दर्जेदार शेती करत यशस्वीपणे कुटुंबाचा गाडा हकत आहे. अकाली दृष्टी गेलेल्या अंध पतीची ती काठीच बनल्याची चितरकथा आहे कल्पना शंकपाळ या महिलेची. 

निफाड : विवाह बंधनात अडकल्यानंतर अवघ्या पाचच वर्षात पतीची हळु हळु दृष्टी जाणे आणि त्याही परीस्थीशि झगडा देत धिरोदात्तपणे आपले डोळे आणि पतीच्या मार्गदर्शनाच्या जोरावर कारसुळ (ता. निफाड) च्या रणरागिणीने दर्जेदार शेती करत यशस्वीपणे कुटुंबाचा गाडा हकत आहे. अकाली दृष्टी गेलेल्या अंध पतीची ती काठीच बनल्याची चितरकथा आहे कल्पना शंकपाळ या महिलेची. 

द्राक्ष पंढरी म्हणुन बिरुद मिरवणारा निफाड तालुका त्यातही कर्जबाजारीपणा आणि निसर्गाच्या लहरीपणा मुळे तालुक्याला आत्महत्यांचे ग्रहण लागलेले असतानाच कारसुळ येथील कल्पना वसंत शंकपाळ या धाडसी महिलेने यशस्वीपणे द्राक्ष शेतीकरत ऐक वेगळा संदेश दिला असून आज जागतिक महिला दिनाच्या निमिताने प्राप्त परीस्थीतीशी दोन हात करणाऱ्या महिलांसाठी त्या रोल मॉडेल ठरल्या आहेत. 

कारसुळ येथील पदवीधर तरुण वसंत शंकपाळ आणि कल्पना यांचा विवाह झाला सुखी संसाराची स्वप्न गिरवत असतांनाच अनाहुत पणे पतीला हळू हळु दिसायला कमी लागले अण दृष्टी गेली, अशातच स्वतःसह पती आणि मुलगा अशी कुटुंबाची जबाबदारी पडली. शेतीचा कुठलाही अनुभव गाठीशी नसताना स्वतःच्या चाडेचार एकर शेतीत आपले डोळे अन पतीची बुद्धी तसेच मार्गदर्शन आणि शेजारच्या शेतकऱ्यांच्या शेतीची मांडणी पाहुन आपली शेतशिवार कसण्यास सुरवात केली.

रात्रीचा दिवस करत कठोर मेहनतीच्या जोरावर काळ्या आईच्या ढेकळांना पाझर फोडत शेतीला कसदार बनवले. त्याला अता बारा वर्ष झाली आहेत. स्वतःच शेतीतील बारे देण्यापासुन ट्रॅक्टरवर स्वार होत फवारणी करण्या पर्यंतची कामे जिद्दीने करत द्राक्ष बागा फुलवल्या. यंदा तर ओखी वादळाच्या तडाख्यातही नव्वद क्विंटल द्राक्षाचे उत्पादन घेतल आहे.

दरवर्षी बँक ऑफ बडोदा कडुन कर्ज घेत नियमितपणे त्याची परत फेड करुन आजमितीस स्वतःचे चार लाखाचे घर आणि ट्रॅक्टर, द्राक्ष शेती उभी केली असुन कुणाचाही अधार नसताना यशस्वी शेती करणाऱ्या कल्पना यांनी विषेश म्हणजे शेती परवडत नाही म्हणणाऱ्या शेतकरी तसेच कर्जमाफी ॉसाठी आग्रही असणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. तसेच कल्पनाने स्वतःचे डोळे आणि पतीच्या बुद्धिच्या जोरावर आपल्या घरात सुखसमृधी आणली हे मात्र नक्की आहे

Web Title: Marathi news nifad news womens day story