राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेसाठी राज्य संघात निशा वैजल हिची निवड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

नाशिकः.वाशीम येथे चौदा वर्षाखालील मुला मुलींच्या शालेय राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मुलींच्या गटात नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व शासकीय कन्या शाळा , जि. प. नाशिक या शाळेने केले होते . स्पर्धेतून बंगलोर येथे डिसेम्बर मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ निवडण्यात आला. त्यात. निशा वैजल हिचा  समावेश करण्यात आला आहे . 

आदिवासी भागातील मुलींच्या क्रीडा कौश्‍यल्याला चालना मिळावी म्हणून जिल्ह्यातील आदिवासी मुलींच्या शिक्षणाची सोय नाशिक येथे जिल्हा परिषदेच्या शासकीय कन्या शाळेत करण्यात आली असून त्यांच्या निवास व भोजन व्यवस्था राज्य शासनाच्या योजनेतून व जिल्हा खो-खो संघटनेच्या माध्यमांतून करण्यात आली आहे . 
नाशिक जिल्हा परिषदेच्या इतिहासातील कुमारी निशा वैजल हि पहिली खो-खो खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे . जिल्हा परिषद नाशिक व नाशिक जिल्हा खो-खो असो. यांच्या महत्वकांक्षी योजनेतून नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या विविध जिल्हा परिषदेच्या शाळेतून निवडक अशा सोळा खेळाडूंना नाशिक येथे आणून त्यांच्या पुढील शिक्षणाची व खोखोतील आधुनिक तंत्राचे ज्ञान होऊन जिल्हा परिषदेच्या शाळेचा क्रीडा क्षेत्रात दर्जा सुधारावा या हेतूने हा नवीन उपक्रम जि. प. अध्यक्ष ना. शीतलताई सांगळे , उपाध्यक्ष नयना गावित तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेंद्र गीते व जिल्हा खो-खो संघटनेतर्फे राबवण्यात आला .

 निशा व तिचे सर्व सहकारी हे जिल्हा खो-खो असो. व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय नाशिक यांच्या वतीने छत्रपती शिवाजी स्टेडियम येथिल खो-खो प्रशिक्षण केंद्रात नियमित सकाळ सायंकाळ अशा दोन सत्रात सराव करतात . त्यांना गीतांजली सावळे व उमेश आटवणे मार्गदर्शन करतात . निशाच्या या निवडीबद्दल नाशिक जिल्हा परिषदचे सर्व पदाधिकारी जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक , शाळेच्या मुख्याध्यापिका कविता साठे , सुनील वाघ आदींनी तिचे अभिनंदन केले . 
 
Web Title: Marathi news nisha vijal selection