निवृत्तिनाथांच्या पालखी सजावटीला माडसांगवीकरांचा साज 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जुलै 2019

नाशिकः आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथून मार्गस्थ होणाऱ्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांचा रथ आणि पालखी रोज सकाळी मुक्कामाच्या ठिकाणी विविध मंडळातील भाविकांतर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या पुष्पांनी, हार-तुऱ्यांनी सुशोभीत करण्यात येते. रोज सकाळी नव्या उत्साहाने निघणाऱ्या पालखीची सजावट हे त्या पालखीचे वैशिष्ट्य असते. यात माडसांगवी येथील कार्यकर्त्यांनी तब्बल अकरा वर्षांपासून या उपक्रमात सातत्य राखले आहे. 

माडसांगवी येथील वै. शिवाजी महाराज पेखळे यांच्या संकल्पनेतून फुलांची रथसजावट करण्यात येते. घोगरगाव (जि. नगर) येथून माडसांगवी येथील मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे रथाची सुरेख सजावट केली जाते. दर वर्षी नाथांच्या पालखीच्या सजावटीतून मिळणारा आनंद काही औरच असतो, असे सांगून सुभाष काठे व गावातील त्यांचे सहकारी दर वर्षी ही मंडळी उत्साहाने रथसजावटीच्या उपक्रमात सहभागी होतात. 

श्री संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालखी आणि रथसजावटीसाठी माडसांगवी येथून सुभाष काठे, राजू महाले, अरुण बिडवे, रमेश वाघ, वासू सोनवणे, पांडुरंग बनकर, सतीश मंडलिक, सुरेश आहेर, राजेंद्र सोनवणे आदी मित्रमंडळी घोगरगावला जाऊन सजावट करतात. रथसजावटीसाठी रोज सुमारे पंधरा ते वीस हजार रुपये खर्च होतो. अकरा वर्षांपासून अविरतपणे निवृत्तिनाथांच्या रथाची आणि पालखीची वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर फुलांनी आकर्षक सजावट केली जाते. नाशिकच्या फूलबाजारातून असंख्य प्रकारची फुले खरेदी करून त्यापासून सुंदर तोरणे, माळा, बुके तयार करून रथ आणि पालखीची आकर्षक सजावट केली जाते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nivrutinath maharaj